फरीदाबाद प्रतिनिधी - शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचला म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्यामुळे मुलाची प्रकृती गंभीर असल्या

फरीदाबाद प्रतिनिधी – शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचला म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्यामुळे मुलाची प्रकृती गंभीर असल्याची संतापजनक घटना फरीदाबाद घडली आहे. गंभीर अवस्थेत विद्यार्थ्याला दिल्लीतील होली फॅमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फरीदाबादमधील डीपीएस सेक्टर 11 स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अपूर्वा सिंह असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे . या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आरोपी शिक्षक लोकेशला निलंबित करण्यात आले आहे.
COMMENTS