मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 2019 मध्ये नरेंद्र मोदींना विरोध करत त्यांच्याविरोधात प्रचार सभा घेतल्या ह
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 2019 मध्ये नरेंद्र मोदींना विरोध करत त्यांच्याविरोधात प्रचार सभा घेतल्या होत्या, मात्र 2024 मध्ये राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावर टीका होतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका बदलली नसून, धोररणावर कायम असल्याचे म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, यंदा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्याचे विश्लेषण देखील केले आहे. पहिल्या पाच वर्षात जे पटले नाही त्याचा विरोध देखील केला आहे. लोकं म्हणतात की, राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे. भूमिका बदलली नाही. धोरणावर कायम असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी सभा घेऊन पंतप्रधान मोदींना बिनशर्थ पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. राज ठाकरेंच्या या निर्णयांमुळे अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यामुळे मनसे सैनिक नाराज असल्याचे समोर आले होते. यावर आज राज ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्यांनी भूमिकेवर कायम असल्याचे सांगितले आहे. 370 कलम हटले, राम मंदिर झाले. 1970 पासून रखडलेली गोष्ट झाली. ज्या कार सेकाकांचा बळी गेला, त्यांचे आत्मे राम मंदिर उभे राहिल्यानंतर शांत झाले असतील, असेही त्यांनी बोलताना म्हटले आहे. नरेंद्र मोदी नसते तर हा मुद्दा प्रलंबित राहिला असता, परंतु मोदींमुळे तो पूर्ण झाला आहे. आता त्यांना पुन्हा एकदा संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिल्याचे राज ठाकरेंनी सांगितले आहे.
COMMENTS