नाशिक प्रतिनिधी :- वनबंधू परिषद आणि एकल ग्राम संघटन तर्फे नाशिक येथे दि.२१ व २२ नोव्हेंबर, २०२३ रोजी क्रीडा स्पर्धेच्या समारोपा प्रसंगी अध्यक्षस
नाशिक प्रतिनिधी :- वनबंधू परिषद आणि एकल ग्राम संघटन तर्फे नाशिक येथे दि.२१ व २२ नोव्हेंबर, २०२३ रोजी क्रीडा स्पर्धेच्या समारोपा प्रसंगी अध्यक्षस्थानी श्री रवी महाजन, समाजसेवक व भा.ज.पा. अध्यात्मिक सेल सचिव यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला. समवेत श्री श्रीनिवास लोया, श्री राहुल मुखेडकर, श्री विवेक करवीर, श्री सुनील चांडक, श्री अशोक तापडीया, श्री राजन लोंढे, श्री शिरीष गुरव, श्री महादेव घोडके, सौ आशाताई कुलकर्णी, सौ मंजुषाताई डहाळे, श्रीमती पुष्पाताई गोटखिंडीकर, सौ रत्ना तापडीया, सौ ऋतुजा लोंढे आदींच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री रवी महाजन यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच खेळाडूंना कोणत्याही प्रकारची मदत लागली तर त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी आदिवासी बांधवांनी एकल गीत सादर केले. त्यानंतर क्रीडा ध्वज उतरविण्यात आला व पुढील स्पर्धा या किनवट येथे होणार असल्याने संबंधित पदाधिकारी यांचेकडे क्रीडाध्वज सुपूर्द केला. सर्व क्रीडा सामन्यांचे समालोचन श्री महादेव घोडके यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ऋतुजा लोंढे यांनी केले, श्री अनिल दहिया यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर सौ शिल्पा मेहता यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
या स्पर्धेत विजयी खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे :-
1. कबड्डी (मुले) – गोंदिया संघ
2. कबड्डी (मुली) – नाशिक संघ
3. 100 मीटर धावणे (मुले)- चेतन पावरा, समाधान माळी, मानस सहारे
4. 100 मीटर धावणे (मुली)- श्रेया सुदेवाद, आरती सहारे, रितू पगरवार
5. 200 मीटर धावणे (मुले)- रतन बरमल, सुमित काजदेकर, रोहित लिल्होरे
6. 200 मीटर धावणे (मुली)- अंजन वसावे, प्रियांका किरकिरा, भरती चौधरी
7.400 मीटर धावणे (मुले)- युसुफ लांजे, जयंत राय, प्रतीक धनगरे
8. 400 मीटर धावणे (मुली)- सानिका चौधरी, सुरभी पावरा, वैष्णवी गिरपुंजे
9. लांब उडी (मुले)- जयंत राय, निखिल मावसकर, ज्ञानेश्वर टेकाम
10.लांब उडी (मुली)- निकिता घरेल, मुक्ताई इजेपवाड, अंजना वसावे
11.उंच उडी (मुले)- अजय भुक्या, जयेश खरपडे, शशिकांत मुरापे
12.उंच उडी (मुली) – गौरी वाघ, ईशा वालदे, अंजना वसावे
13. कुस्ती 45 किलो – भावेश वारघडे, घोटी
14. कुस्ती 48 किलो – गौरव वारघडे, घोटी
15. कुस्ती 51 किलो – विक्रम कुंडे, नाशिक
16. कुस्ती 55 किलो – साहिल दाते, परतवाढा
17. योगासने (मुले) – तानाजी अस्वले, महेश पारधी, रतन बरमल
18. योगासने (मुली)- ज्योत्स्ना वागळे
अशी माहिती शैलेंद्र साळी यांनी दिली.
COMMENTS