Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाक्रिटीकॉन २०२३ राज्यस्तरीय परिषदेचे शुक्रवारपासून आयोजन

आपत्कालीन उपचाराबाबत तीन दिवसीय परिषदेत तज्ञ करणार मार्गदर्शन

नाशिक- इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन (आयएससीसीएम) यांच्या नाशिक शाखेच्या वतीने अकराव्या महाक्रिटीकॉन २०२३ या राज्यस्तरीय परीषदेचे आयोज

 नवी मुंबई मध्ये 2 श्वानांचे लग्न
नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड : राम शिंदे
पाचगणीच्या भुरळ घालणार्‍या नैसर्गिक सौंदर्यात सेल्फी पॉइंटची भर; पर्यटकांची तुफान गर्दी

नाशिक- इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन (आयएससीसीएम) यांच्या नाशिक शाखेच्या वतीने अकराव्या महाक्रिटीकॉन २०२३ या राज्यस्तरीय परीषदेचे आयोजन केले आहे. येत्या २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान हॉटेल एक्स्प्रेस इन येथे ही परीषद पार पडणार असून, आपात्कालीन परीस्थितीतील उपचारांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक कार्यशाळा व व्याख्यान, समूह चर्चेतून मार्गदर्शन करणार आहेत. ’कोलॅबरेटिव्ह ट्रासफॉर्मेशन इन क्रिटिकल केअर मेडिसिन’ अशी या परीषदेची संकल्पना असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.यतिंद्र दुबे, आयोजन समितीचे सचिव डॉ.पंकज राणे यांनी दिली.

या परीषदेसाठी आयएससीसीएम नाशिकचे अध्यक्ष डॉ. दिनेश वाघ, सचिव डॉ.रुचिरा खासणे, महाक्रिटीकॉनचे सायंटिफिक कमिटीचे अध्यक्ष डॉ.देवदत्त चाफेकर, खजिनदार डॉ.हितेंद्र महाजन तर आयोजन समिती सदस्य डॉ.अभिनंदन मुथा, डॉ.भाविक शाह, डॉ.मकरंद राणे, डॉ.महेश बनसोड, डॉ.स्वप्निल साखला, डॉ.विलास कुशारे हे परीश्रम घेत आहेत. यापूर्वी नाशिक शाखेतर्फे २०१५ मध्ये तिसर्या महाक्रिकटीकॉन या राज्यस्तरीय परीषदेचे आयोजन केले होते. तेव्हा ’क्रिटीकल केअर इन रिसोर्सेस लिमिटेड सेटींग्स’ अशी परीषदेची संकल्पना होती. पुन्हा एकदा नाशिक शाखेला राज्यस्तरीय परीषद आयोजित करण्याचा बहुमान मिळालेला आहे.

या परीषदेअंतर्गत २४ नोव्हेंबरला विविध विषयांवरील कार्यशाळा पार पडणार आहेत. काही कार्यशाळा परीषद स्थळ असलेल्या एक्स्प्रेस इन येथील विविध सभागृहांमध्ये पार पडतील. तर प्रात्येक्षिकांवर आधारित काही कार्यशाळा या थेट आयसीयूतून प्रक्षेपित केल्या जातील. २५ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजतापासून सत्रांना सुरुवात होईल. तर या दिवशी सायंकाळी सहा वाजता परीषदेचा औपचारीक उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरलाही विविध सत्रांवरील परीसंवाद पार पडतील.

या विषयांवर परीषदेत सत्रांचे केले आहे आयोजन – या परीषदेमध्ये आपात्कालीन वैद्यकीय उपचार याविषयाच्या विविध पैलूंना स्पर्श केला जाणार आहे. यामध्ये अपघातातील अत्यावस्थ रुग्णांना द्यावयाचे तातडीचे वैद्यकीय उपचारापासून प्रसुतीदरम्यान उद्भवणारी गुंतागुंत, हृदयविकार, मेंदूविकाराशी निगडित आपात्कालीन परीस्थितीतील उपचाराची दिशा, रक्तविकार संस्थेची तसेच पॅथेलॉजीची उपचार प्रक्रियेतील भूमिका अशा विविध विषयांचा अर्ंतभाव या परीषदेत केला आहे.

COMMENTS