अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा सुपरहिट चित्रपट पुष्पाच्या सीक्वलची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता त्यांच्यासाठी एक आनंदाची ब

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा सुपरहिट चित्रपट पुष्पाच्या सीक्वलची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘पुष्पा २’ च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘पुष्पा २’चा सेट पाहायला मिळतो आहे. ‘पुष्पा २’ हा २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सीक्वल आहे, ज्यामध्ये रश्मिका मंदानाने श्रीवल्लीची भूमिका केली होती. दुसऱ्या भागात ती याच भूमिकेत दिसणार आहे. ‘पुष्पा: द राइज’मध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत होता आणि त्याच्यासोबतची रश्मिका मंदानाची जोडी खूप आवडली होती. रश्मिका आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा म्हणजेच पुष्पा २ चा देखील एक भाग आहे आणि तिने शूटिंगला सुरूवात केली आहे. रश्मिकाने शूटचा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले की, ‘नाईट शूट’. ‘पुष्पा २: द रुल’ बद्दल बोलायचे तर तो २०२४च्या सुरुवातीला रिलीज होऊ शकतो. चित्रपटाचा पहिला भाग १७ डिसेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित झाला आणि त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुमारे ३०० कोटींची कमाई केली. आता चाहत्यांना ४०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पुष्पा २’ची प्रतीक्षा आहे. ‘पुष्पा’चा पहिला भाग रिलीज होण्यापूर्वीच दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपटातील काही दृश्ये शूट केली होती. पण नंतर त्यांनी चित्रपटाच्या कथेत काही बदल केले आणि आता त्या अनुषंगाने ‘पुष्पा २’ पुन्हा शूट करण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब होत आहे.
COMMENTS