Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

चावी शिवाय स्टार्ट होणार स्कूटर

चोरी करताना चोरही दहावेळा विचार करेल

नवी दिल्ली प्रतिनिधी - होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियानं जानेवारी महिन्यात आपली लोकप्रिय स्कूटर Activa 6G ला नव्या H-Smart तंत्रज्ञानासह

भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार
गुरुजींच्या डमीला हद्दपार करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये गुरूजींचे फोटो
दिव्यांग सहाय्य संस्था सुरू करण्याचा मानस : कुलपती डॉ. सुरेश भोसले

नवी दिल्ली प्रतिनिधी – होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियानं जानेवारी महिन्यात आपली लोकप्रिय स्कूटर Activa 6G ला नव्या H-Smart तंत्रज्ञानासह लॉन्च केली होती. नुकतंच कंपनीनं आपल्या Activa 125 H-Smart चा टीझरही समोर आणला होता. आता कंपनीनं अधिकृतरित्या वेबसाइटवर या नव्या स्कूटरची किंमत जाहीर केली आहे. नवी स्मार्ट फिचरसह येणारी Activa 125 H-Smart स्कूटरची किंमत ८८,०९३ रुपये (एक्स-शो रुम, दिल्ली) इतकी जाहीर करण्यात आली आहे. कंपनीनं अधिकृतरित्या या स्कूटरची लॉन्चिंगची घोषणा केलेली नाही. पण वेबसाइटवर मात्र नव्या स्कूटरची किंमत जाहीर करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार नवी Activa 125 आता आधीपेक्षा स्मार्ट होणार आहे. यात स्मार्ट-की फिचर देण्यात आलं आहे. यात एक डिजिटल मीटर देण्यात आलं आहे जे तुमच्या राइडची संपूर्ण माहिती रियल टाइम अपडेट देतं. Honda Activa 125 H-Smart मध्ये काय आहे खास? नव्या स्कूटरमध्ये कंपनीनं यात अॅडव्हान्स फिचर्सचा समावेश केला आहे. यात ड्रायव्हिंग एक्सपीरिअन्स पूर्णपणे बदलला आहे. नवी स्कूटर अँटी-थेफ्ट अलार्मसह इतर फिचर्सनं सज्ज असणार आहे. यामुळे स्कूटर चोरी होण्याची समस्या पूर्णपणे नाहीशी झाली आहे. तुमची स्कूटर तुमच्या नजरेपासून दूर असली तरी ती सुरक्षित राहिल असा दावा कंपनीनं केला आहे. अँटी-थेफ्ट सिस्टम तुमच्या स्कूटरला पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करते. स्कूटर पार्क केली तर वारंवार तिचं लॉक तपासून पाहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही जसं तुमच्या स्कूटरपासून दोन मीटर अंतरापेक्षा दूर जाल तसं इमोबिलायजर फक्शन सक्रीय होतं आणि स्मार्ट-की लॉक कार्य करण्यास सुरुवात करतं. तुम्ही स्मार्ट-कीच्या माध्यमातून सहजपणे तुम्ही स्कूटरची सीट, फ्ल्यूअल कॅप, हँडल इत्यादी लॉक किंवा अनलॉक करू शकता. तसंच तुम्ही स्कूटर एखाद्या गर्दीच्या ठिकाणी पार्क केली तर ती शोधताना देखील तुम्हाला अडचण होणार नाही. स्कूटरमध्ये कंपनीनं स्मार्ट फाइंड सिस्टम दिलं आहे. स्मार्ट किच्या माध्यमातून तुम्ही स्कूटर सहजपणे शोधू शकता. एका बटणावर स्कूटरचे साइड इंडिकेटर्स ब्लिंक होतात.

COMMENTS