भारतात लहानपणी सर्वानांच रामायण, महाभारत पाहायचे वेड लागलेले होते. काय होते त्यात?, तर युद्ध. कशासाठी?, तर सत्ता, संपत्ती, आणि सामाजिक दर्जासाठी. माण
भारतात लहानपणी सर्वानांच रामायण, महाभारत पाहायचे वेड लागलेले होते. काय होते त्यात?, तर युद्ध. कशासाठी?, तर सत्ता, संपत्ती, आणि सामाजिक दर्जासाठी. माणूस या गोष्टीसाठी किती क्रूर बनतो, हे आपण पाहिले आहे. या सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेसाठी माणसांकडूनच माणसे मारली गेली. रक्ताचे पाट वाहिले. किती हा क्रूरपणा. याशिवाय माणसांना प्रेमाने शांततेत जीवन जगता येणार नाही का? तसे जीवन जगायला आपल्या जगात अडथळा आहे तो धर्माचा. माणूस हा सतत अनुकरणशील जीवन जगत असतो. त्यात तो आपल्या धर्माचे किंबहुना: देवाचे अनुकरणीय जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. मग समजा, रामभक्त रामाचे अनुकरण करत किंवा भक्ती करत जीवन जगणारे असतात. मग प्रश्न हा आहे की, रामाच्या जीवनाला युद्धाचे संदर्भ आहेत का? मग आता शांततेत कसं जगणार? असो. विषय आहे युक्रेन आणि रशिया युद्धाचा. पण, युद्ध घडतातच कशी? मग ती कोणत्याही देशाची असो वा देशांतर्गत. याच्या मुळात जाणे क्रमप्राप्त.
सध्या युक्रेन आणि रशिया यांचे युद्ध सुरु होण्याच्या हालचाली सुरु आहेत. हे युद्ध सुरु झाले तर त्याचा परिणाम हा जवळपास जगावर होणार आहे. हा नेमका वाद काय आहे हे लक्षात घेणे गरजेचे. यूक्रेन हा तसा स्वातंत्र्यवादी देश आहे. या देशावर पश्चिम यूरोपचा जाम त्याच्यावर पगडा आहे. रशिया देशामध्ये जशी एकाधिकारशाही आहे तशी युक्रेन देशात नाही. सध्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आहेत. तर युक्रेनचे पंतप्रधान आर्सेनिय यात्सेन्युक असून राष्ट्राध्यक्ष पेत्रो पोरोशेन्को हे आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपल्या सैन्याला युक्रेन विरुद्ध युद्धाचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या कीव आणि खारकीव या दोन शहरांवर रशियाने मिसाइल स्ट्राइक केला आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या दिशेने चाल करुन येत असताना, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. या युद्धाला तसे अनेक संदर्भ आहेत. पुतीनला सर्वात मोठी भीती आहे ती लोकशाहीचीच. कारण रशियात हुकूमशाही आहे. तर सोव्हिएत यूनियनमधून यूक्रेन हा फुटून बाहेर पडला आणि त्यानं लोकशाही प्रणाली स्वीकारली. यूक्रेन हा एक मुक्त देश झाला. बरं यूक्रेन आणि रशियात तसा काही फरक नाही. जर यूक्रेनमध्ये लोकशाही नांदू शकते तर मग रशियात का नाही? आणि तोच विचार पुतीनची रशियातली एकाधिकारशाही संपवू शकतो याची भीती मास्कोला आहे. आणि त्यामुळेच हे युद्ध सुरु झाले आहे. यूक्रेननं नाटो तसच युरोपीय विविध देशाबरोबर आर्थिक तसेच मिलिट्री संबंध पूर्णपणे तोडून टाकावेत असा दबाव पुतीनचा. यूक्रेन हा नाटो देशांचा भाग झाला आहे तर ते रशियासाठी अत्यंत धोकादायक होऊ शकते ते तातडीनं थांबवण्यासाठी पुतीननं यूक्रेनच्या सीमेवर सध्या लष्कर उभं केलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर नाटोची निर्मिती झाली. ती मुळात रशियाला रोखण्यासाठीच. यात अमेरीका, इंग्लंड, डेन्मार्क, फ्रान्स, आईसलंड, इटली, बेल्जियम, कॅनडा अशा सगळ्या डॉन देशांचा समावेश. याच लिस्टमध्ये यूक्रेनचा समावेश होणे म्हणजे अमेरीका, इंग्लंडचं लष्कर रशियाच्या अंगणात उभं केल्यासारखं आहे. त्यामुळे तेच पुतिनला नकोय. यूक्रेनसोबतचे सर्व संबंध तोडा, अशी पुतीनची सध्याची मागणी. युक्रेन ते संबंध तोडायला नाकारत आहे. त्यामुळेच हे युद्ध अटळ. याचे सरळ सरळ गणित हेच आहे की, सत्ता, संपत्ती, सामाजिक दर्जा यासाठी या सर्व भानगडी.
आता या सर्व भानगडीचा म्हणजे, युद्धाच्या भूमिकेचा इतिहास जर आपण उघडून पाहिला तर तो हिंसार माणसांत येतो कुठून? तर त्याचे मूळ आहे धर्मात. मग तो धर्म कोणत्याही देशाचा असो. आपल्याकडे मागील काही महिन्यापूर्वी दोन मुस्लिम देशात झालेले युद्ध आपण पाहिले आहेत. त्याला संदर्भ होते कट्टरतावादाचे. म्हणजे, मुस्लिम धर्मातील लोक हे कट्टरतावादी आहेत. तसे ते सर्वच धर्मात असते. प्रत्येक धर्मातील कट्टरतावाद हा युद्धाला आमंत्रण देत असतो. याला जबाबदार कोण? तर धर्मातील रूढीवादी परंपरा आणि तो धर्म देखील. धर्माचा इतिहास पाहिल्यास किंवा ज्या- त्या धर्माचे देव देवतांच्या इतिहाचाचे पाने आपण उलटल्यास लक्षात येते की, सत्ता, संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठेसाठी यांनी युद्ध केलेले आहे. त्यामुळे या देव- देवतांचे अनुकरण करत जगणाऱ्या लोकांमध्ये ते आपोआप उतरते. याला जगातला कुठलाच देश अपवाद नाही. माणसाला शांततेने जगण्याचा मार्ग दाखवणारे अनेक मार्गदाते आपल्या जगात होऊन गेले आहेत. पण, जीवन सुखी बनवण्याच्या नावाखाली धर्माचा आधार घेणारा प्रत्येक देश किंवा माणूस त्याच्या हिंसेला किंवा त्या देशाच्या युद्धाला धार्मिक संदर्भ संदर्भ असतोच. यात नुकसान आहे ते माणसाचेच.
COMMENTS