शिरूर प्रतिनिधी - शहरातील मुख्य रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यातील गढुळ पाण्यात अंघोळ करून मनसे तालुकाध्यक्ष सोपान मोरे यांनी लक्षवेधी आंदोलन केले आ

शिरूर प्रतिनिधी – शहरातील मुख्य रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यातील गढुळ पाण्यात अंघोळ करून मनसे तालुकाध्यक्ष सोपान मोरे यांनी लक्षवेधी आंदोलन केले आहे.गत अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत.या खड्डयात पावसाळ्यात पाणी साचत असते.या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून नगरपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सोपान मोरे यांनी हे अनोखे आंदोलन केले आहे.पोलीस स्टेशन समोर असलेल्या खड्डयाची पूजा करून श्रीफळ फोडून आंदोलनाला सुरुवात केली.त्या नंतर वाजंत्री लावून स्थानिक नागरिकांना जागे करत स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ असलेल्या मोठ्या खड्डयाभोवती फुलांची आरास मांडत पूजा केली.या वेळी प्रशासनाच्या निषेधार्ह घोषणा देत साचलेल्या गढूळ पाण्यात अंघोळ केली. शहरात येणार्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून नाल्या देखील अर्धवट अवस्थेत आहेत.नाल्यांची कामे पूर्ण न झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येते.रस्त्याचे काम दर्जेदार नसल्यामुळे हि परिस्थिती निर्माण झाली असून नाल्यांची कामे अर्धवट का राहिली याची चौकशी देखील करण्याची मागणी सोपान मोरे यांनी केली आहे. नगरपंचायतच्या येणार्या मासिक बैठकीत मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्ड्या संदर्भात चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येईल.नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सदरील खड्डे बुजविण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. शहरातील पोलीस स्टेशन समोर असलेल्या खड्डयात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.दुचाकी आणि पादचारी नागरीकांना खड्डा चुकवत वाट काढावी लागते.खड्ड्याच्या मागच्या बाजूला नगरपंचायतने स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत स्वच्छ परिसर स्वच्छ घर अशी भिंतीवर जाहिरात लावली आहे.जिथे जाहिरात लावली आहे तिथेच पाणी साचल्यामुळे नगरपंचायतचा दिव्याखाली अंधार स्पष्ट दिसत आहे.
COMMENTS