Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’सीएचबी’ धारक प्राध्यापकांचे आंदोलन सुरुच

पुणे/प्रतिनिधी ः  प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून राज्यभरात तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे सेट - नेट, पीएचडी धारक संघर्ष समि

युवकांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मोफत केली पीक नोंदणी
…तर, नवनीत राणांनी महिला आयोगाकडे तक्रार करावी : रुपवते
शेतकर्‍यांची वीज तोडल्यामुळे महावितरणला ठोकले ठाळे

पुणे/प्रतिनिधी ः  प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून राज्यभरात तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे सेट – नेट, पीएचडी धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. पुणे व अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातील कार्यक्षेत्र असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा काळातच तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांकडून बेमुदत कामबंद आंदोलन केले जात असल्याने अगोदरच विद्यापीठाच्या लांबलेल्या परीक्षा व त्यांचे निकाल रखडण्याची शक्यता आहेत.

सीएचबीधारक प्राध्यापकांनी विद्यापीठांच्या परीक्षांवर बहिष्कारास्त्र टाकल्याने विविध विद्याशाखांच्या परीक्षांच्या आयोजनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. तर दुसरीकडे पुणे विद्यापीठाच्या 10 जानेवारीपासून वाणिज्य शाखेच्या वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या असून या परीक्षांच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी पदवी व पदव्यूत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांवर दिल्याचा आरोपही संघर्ष समितीकडून करण्यात आला आहे.

COMMENTS