नांदेड - कंधार तालुक्यात पांगरा (तळ्याचे) हे गाव हेमाडपंथी महादेव मंदिरामुळे पंचक्रोशीत ओळखले जाते. सदरील गावात प्रत्येक समाजाची माणसे ही गुन्ह्य
नांदेड – कंधार तालुक्यात पांगरा (तळ्याचे) हे गाव हेमाडपंथी महादेव मंदिरामुळे पंचक्रोशीत ओळखले जाते. सदरील गावात प्रत्येक समाजाची माणसे ही गुन्ह्यागोविंदाने नांदत असतात. अशा प्रकारे सर्व गाव चालत असताना भारत देश स्वातंत्र्याचा आनंद उत्सव साजरा करीत असताना दि. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास दुकानास जाणार्या एका शाळकरी सोळा वर्षीय मुलास गावातील रोहन गंपू घोरबांड याने जातीवाचक शिवीगाळ करीत जबर मारहाण करून डोक्यात गंभीर दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार पो.स्टे. लोहा येथे गु.र.न. 193/23 अन्वये गुन्हा दाखल असून अद्यापही आरोपीस अटक करण्यात आली नाही. आरोपी मोकाट फिरत असून फिर्यादीना जीवे मारण्याच्या आणि संपूर्ण कुटुंब उध्वस्त करण्याच्या धमक्या देणे सुरूच आहे. त्यामुळे येथील दलित कुटुंबीयांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आरोपी कसे निर्दोष सुटतील याची पुरेपूर काळजी लोहा पोलीस घेत असल्याची माहिती पुढे येत आहे.
लोहा पोस्टेच्या हद्दीत असलेल्या पांगरा (तळ्याचे) ता.कंधार जि. नांदेड येथील इयत्ता दहावीत शिक्षण घेणारा विजय वाघमारे हा किराणा सामान आणण्यासाठी दि. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावातील एका दुकानाकडे जात होता. पाणीपुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीजवळ समाज मंदिरासमोर असलेल्या ठिकाणी आरोपी रोहन घोरबांड याने पोतलिंग असे जातिवाचक शब्द प्रयोग करून विजय वाघमारे यास चिडविले. विजय याने रोहन घोरबांड यास असे का चिडवतोस म्हणाला असता अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण करीत हातातील कड्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. व तुला खतम करतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलीस ठाण्यात वरील प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात करीत असून आरोपी मात्र आतापर्यंत सापडलेला नसून पोलिसांच्याच तपासावर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. सदरील घटना घडवून अंदाजे 12 ते 13 दिवस होत असून आरोपी हा लोहा कंधार तालुक्यामध्ये असण्याची शक्यता परिसरातील जनतेतून वर्तविली जात असून लोहा पोलीस मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरत असताना दिसत आहेत. पीडित कुटुंब दहशतीखाली वावरत असून लोहा पोलिसांनी लक्ष देऊन आरोपीस अटक करून संबंधित कुटुंबास न्याय देतील अशी अपेक्षा जन सामन्यातून व्यक्त होताना दिसत आहे.मात्र पोलिसांनी घटनेचा पंचनामा,तपास टीपणआणि स्टेशन डायरीच्या नोंदी जुळत नसल्यामुळे आरोपी निर्दोष सुटतील अशी चर्चा पोलीस कर्मचारात होत आहे.
COMMENTS