Homeताज्या बातम्या

नांदेडकरांचा कौल विकासाला; भाजपाचा विजय म्हणजे विश्‍वासाचा कौल ः खा. अशोकराव चव्हाण

नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयावर भाजपाचे निवडणूक प्रचार प्रमुख तथा राज्य

ओवेसी यांच्याकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचं अंगवस्त्र म्हणूनच पहिले जाईल…
हिमाचल प्रदेशात भाजपला बंडखोरीचे ग्रहण
मुंबईत महायुतीचा विजय अटळ ः मुख्यमंत्री फडणवीस

नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयावर भाजपाचे निवडणूक प्रचार प्रमुख तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी तीव्र पण सकारात्मक राजकीय संदेश दिला आहे. हा विजय कोणत्याही व्यक्तीचा नसून नांदेडकरांनी विकास, सकारात्मकता आणि स्थिर नेतृत्वावर दाखवलेल्या विश्‍वासाचा कौल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी नांदेडकरांचा मनापासून आभारी आहे. त्यांनी पुन्हा एकदा भाजपावर विश्‍वास टाकत स्पष्ट बहुमत दिले. हे यश माझे नसून नांदेडकरांच्या विश्‍वासाचे आहे, अशी भावना व्यक्त करत अशोकराव चव्हाण यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला तसेच भाजपाच्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांच्या अथक मेहनतीला दिले.
भाजपाला मिळालेले स्पष्ट बहुमत हे नांदेडकरांचा विकासाला दिलेला कौल असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. विरोधकांकडे कोणतेही ठोस मुद्दे नव्हते. विकास, प्रशासन किंवा शहराच्या भविष्यासंदर्भात त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते. फक्त शिव्याशाप, अपप्रचार आणि नकारात्मकता हाच त्यांचा प्रचाराचा केंद्रबिंदू होता. मात्र नांदेडचा मतदार सुज्ञ आहे. त्याला नकारात्मक राजकारण आवडत नाही, हे या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले. या निकालामुळे विरोधक भुईसपाट झाले असून, नांदेडकरांनी स्पष्टपणे भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले. हा विजय म्हणजे केवळ संख्याबळाचा नाही, तर मानसिकतेतील बदलाचा आहे. नांदेडकरांनी आता विकास, स्थिरता आणि सकारात्मक राजकारणाची निवड केली आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बूथ पातळीपासून शहर पातळीपर्यंत केलेल्या संघटित कामाचे कौतुक करत अशोकराव चव्हाण म्हणाले की, हा विजय हजारो कार्यकर्त्यांच्या कष्टातून उभा राहिला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, त्यामुळेच हा ऐतिहासिक निकाल शक्य झाला. शेवटी नांदेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी म्हटले, माझ्यावर दाखवलेले प्रेम, सहकार्य आणि विश्‍वास यासाठी मी नांदेडकरांचा कायम ऋणी आहे. हा विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एकूणच, अशोकराव चव्हाण यांच्या प्रतिक्रियेतून भाजपाचा विजय हा आत्मविश्‍वासपूर्ण, विकासाभिमुख आणि विरोधकांच्या नकारात्मक राजकारणावर मिळवलेला निर्णायक विजय असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.

COMMENTS