Homeताज्या बातम्यादेश

पालकाने घेतला शिक्षकाला चावा

भोपाळ ः मध्यप्रदेशमध्ये गुन्हेगार वाढत असून, आपल्या मुलीला शाळेत साफसफाई करायला सांगितल्याने पालकाने शिक्षकाच्या बोटाचा चावा घेत बोट तोडले आहे. प

नगर अर्बनच्या आजी-माजी संचालकांना अजामीनपात्र वॉरंट
‘आवर्तन’चा शतकपूर्ती संगीत महोत्सव 24 व 25 जून रोजी लातुरात
नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू

भोपाळ ः मध्यप्रदेशमध्ये गुन्हेगार वाढत असून, आपल्या मुलीला शाळेत साफसफाई करायला सांगितल्याने पालकाने शिक्षकाच्या बोटाचा चावा घेत बोट तोडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय जगन्नाथ साहू असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मुलीच्या पालकाला अटक केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शिक्षकावर देखील कारावाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पोलिस स्टेशबाहेर आंदोलन देखील केले आहे.

COMMENTS