अमरावती प्रतिनिधी - विदर्भातील मानाची पालखी समजली जाणारी कौंडिण्यपूर या रुक्मिणीच्या माहेरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. चाळीस दिव

अमरावती प्रतिनिधी – विदर्भातील मानाची पालखी समजली जाणारी कौंडिण्यपूर या रुक्मिणीच्या माहेरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. चाळीस दिवस पैदल वारी करत हे सगळे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठुरायाच्या चरणी लीन होणार आहे. कोरोनाच्या काळात देखील ज्या दहा पालख्यांना पंढरपूर येथे प्रवेश देण्यात आला होता. त्यात सुद्धा या पालखीला मान मिळाला होता. 428 वर्ष या पालखीला पूर्ण झाल्या असून 429 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
COMMENTS