ओमायक्रॉननंतर जगावर ‘डेल्मिक्रॉन’चे सावट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओमायक्रॉननंतर जगावर ‘डेल्मिक्रॉन’चे सावट

नवी दिल्ली/मुंबई : जगभरात ओमायक्रॉनच्या व्हेरियंटन धुमाकूळ घातला असतांनाच, आता डेल्मिकॉनचे सावट देखील पुढे येत आहे. पाश्‍चिमात्य देश करोनाच्या डेल्टा

यंदा कापूस उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत घट
जिल्हाधिकारी देणार शासकीय रुग्णालयांना नियमित भेटी
कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांच्या विकासासाठी बारामतीत प्रशिक्षण वर्ग संपन्न

नवी दिल्ली/मुंबई : जगभरात ओमायक्रॉनच्या व्हेरियंटन धुमाकूळ घातला असतांनाच, आता डेल्मिकॉनचे सावट देखील पुढे येत आहे. पाश्‍चिमात्य देश करोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या दुहेरी संकटामध्ये अडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. भारतामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 350 रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्येही डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढतील असे यापूर्वीच तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. मात्र लसीकरण आणि डेल्टाचा प्रादुर्भाव पाहता भारताआधी युरोपीयन देश आणि पाश्‍चिमात्य देशांमध्ये डेल्मिक्रॉनचा अधिक परिणाम दिसून येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्क फोर्सचे सदस्य असणार्‍या शशांक जोशी यांनी, डेल्मिक्रॉन या डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या एकत्र संसर्गामुळे युरोप आणि अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय, असे सांगितले. ओमायक्रॉन पहिल्यांदा नोव्हेंबर महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आढलून आलेला. आतापर्यंत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव तब्बल 89 देशांमध्ये झाला.
डेल्मिक्रॉन हा कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट नाहीय. पण यामध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या स्ट्रेनचा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि करोना रुग्णांची संख्या फार झपाट्याने वाढते. एका अहवालानुसार, ओमायक्रॉनचा अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. तर सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशनने दिलेल्या माहितीनुसार डेल्टा व्हेरिएंटच्या प्रादुर्भावापैकी 99.5 टक्के प्रकरण ही अमेरिकेशी संबंधित आहेत. प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनमुळे अमेरिकेमध्ये आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रोगप्रतिकारशक्ती कमी असणार्‍या लोकांबरोबरच, वयस्कर व्यक्ती, गंभीर आजार असणार्‍या व्यक्तींना डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. कमी लसीकरण झालेल्या भागांमध्ये हे दोन्ही व्हेरिएंट फार वेगाने प्रादुर्भाव करु शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे. मात्र दोन्ही व्हेरिएंट एकत्र येऊन एक सुपर स्ट्रेन तयार करतात की नाही यावरुन तज्ज्ञांमध्येच मतमतांतरे आहेत. काही संशोधकांनी दिलेल्या इशार्‍यानुसार अशाप्रकारे एकाच वेळी दोन व्हेरिएंट सक्रीय असले तरी ते एकत्र येऊन नवीन व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता दुर्मिळ आहे. मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळताही येणार नाही.

देशात ओमायक्रॉनचे 354 रुग्ण
भारतामध्ये ओमायक्रॉनचे 354 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या डेल्टा डेरिवेटिव्स, डेल्टा प्रकारातील विषाणूचा भारतामध्ये प्रादुर्भाव होतोय. जगभरातील अनेक देशांमध्ये आता डेल्टापेक्षा अधिक वेगाने ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होतोय. मात्र भविष्यात डेल्टा डेरिवेटिव्ह आणि ओमायक्रॉन विषाणू कशा पद्धतीने परिणाम करतील हे आताच सांगता येणार नाही किंवा त्याचा अंदाजही बांधता येणार नाही.

COMMENTS