Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक

उमरग्यात कार, तर बीडमध्ये पेटवली बस

जालना/प्रतिनिधी ः मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली असली तरी, मराठा आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे गुरुवारी दिसून आले. आरक

शिंदे-भाजप सरकार असंवैधानिक : पटोले
पुण्यात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद
कार वरील ताबा सुटल्याने कार आणि चालक थेट नाल्यात.

जालना/प्रतिनिधी ः मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली असली तरी, मराठा आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे गुरुवारी दिसून आले. आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील माडज येथील किसन माने या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर या घटनेचे पडसाद उमरग्यात उमटले असून, संतप्त जमावाने कार पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये आंदोलकांनी बस पेटवून दिली आहे, यासोबतच आंदोलकांनी सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक होतांना दिसून येत आहे.
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने आंदोलने केली जात आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागत आहे. बुधवारी रात्री बीडमध्ये काही मराठा आंदोलकांनी गेवराई आगारात एसटी बस पेटवून दिली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सदरील बस प्रवाशांना घेऊन छत्रपती संभाजीनगर येथून लातूरच्या अहमदपूर येथे जाण्यासाठी निघाली होती. तर दुसरीकडे उमरग्यात तरुणाच्या आत्महत्येनंतर मराठा तरुणांनी उमरगा बंदची हाक दिली आहे. तसेच आत्महत्या करणार्‍या तरुणाचा मृतदेह तहसील कार्यायलयासमोर ठेवण्यात आला. तसेच जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. दरम्यान तहसिल परिसरात मराठा समाजाचे आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. काही आंदोलकांनी येथील रस्त्यावर एक कार पेटवून दिली. त्यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्यथा सामूहिक जलसमाधी घेऊ – मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच्या परळीमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला असून दोन दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा सामूहिक जलसमाधी घेऊ, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालन्यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी व कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. त्यानंतर राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. मराठा आरक्षणासाठी बीडमध्येही मराठा समाज आक्रमक झाला असून नागपूर वान धरणावर धरणे आंदोलन सुरु आहे.

COMMENTS