ओबीसी फॅक्टर पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी फॅक्टर पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल

लोणावळा/प्रतिनिधी : दैनिक लोकमंथन व लोकन्यूज-24 माध्यम समूहाचे प्रमुख संपादक व ओबीसी चळवळीचे नेते डॉ. अशोक सोनवणे यांनी लिहिलेले ओबीसी फॅक्टर हे पुस्

विश्‍वनाथ कातोरे यांचे निधन
कोपरगावात प्रशासनाने ठोकले प्रसिध्द हॉस्पिटला टाळे
जागर वाचनाचा उपक्रमामुळे वाचन चळवळ बळकट

लोणावळा/प्रतिनिधी : दैनिक लोकमंथन व लोकन्यूज-24 माध्यम समूहाचे प्रमुख संपादक व ओबीसी चळवळीचे नेते डॉ. अशोक सोनवणे यांनी लिहिलेले ओबीसी फॅक्टर हे पुस्तक सध्याच्या सर्वच आरक्षणासंदर्भातील अनेकविध चर्चांच्या पार्श्‍वभूमीवर समाजाला दिशादर्शक ठरेल, असा विश्‍वास लोणावळा येथे नुकत्याच झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
लोणावळा येथे नुकतेच कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश या संस्थेचे दोन दिवशीय अधिवेशन उत्साहात झाले. या अधिवेशनात डॉ. सोनवणे यांनी लिहिलेल्या ओबीसी फॅक्टर या पुस्तकाचे प्रकाशन काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शरद आहेर व राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. लोणावळा येथील नारायणी धाम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे, सतीश दरेकर, लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाचा दस्तावेज
ओबीसी फॅक्टर या पुस्तकाच्या माध्यमातून ओबीसींविषयीचा महत्त्वाचा व समाजाला दिशा देणारा दस्तावेज उपलब्ध झाल्याचे गौरवोदगार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. सध्या ओबीसींसह सर्वच आरक्षणाच्या विषयावर अस्वस्थता वाढली आहे. आरक्षण असावे वा नसावे, आरक्षणाचे फायदे-तोटे यासह आरक्षणावरून सुरू असलेला राजकीय कलगीतुरा असे अनेकविध विषय राज्यात व देशात चर्चेत आहेत. विकासापासून कोसो दूर असलेल्या समाजघटकाला आरक्षणाचा मदतीचा हात विकासाच्या वाटेवर आणणारा असतो. पण हे वास्तव नाकारून राजकीय हेवेदावेच या विषयाच्या अनुषंगाने समाजासमोर येतात. या पार्श्‍वभूमीवर ओबीसी फॅक्टर या पुस्तकाने आरक्षणाचे वास्तव लेखांच्या माध्यमातून मांडले असून, यातील प्रत्येक लेख वाचणारांना अंतर्मुख करतो. त्यामुळे या पुस्तकाद्वारे समाजाला व नव्या पिढीला नवी दिशा मिळणार आहे, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पुस्तकाचे लेखक डॉ. सोनवणे यांनी यावेळी पुस्तकाची माहिती दिली तसेच ते लिहिण्यामागची भूमिका विषद केली.

चौथे दिशादर्शक पुस्तक
दैनिक लोकमंथन व लोकन्यूज-24 माध्यम समूहाचे प्रमुख संपादक तसेच ओबीसी चळवळीचे नेते या नात्याने समाजातील तळागाळातील घटकांशी थेट संपर्क असलेल्या डॉ. अशोक सोनवणे यांनी ओबीसी फॅक्टर हे पुस्तक लिहिले आहे. हे त्यांचे चौथे पुस्तक आहे. याआधी हिंदू पूर्वी कोण होते, बहुजन व सत्तांतर अशी तीन पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. ओबीसी फॅक्टर या पुस्तकात त्यांनी 2013पासून ओबीसींसंदर्भात घडलेल्या घटना व त्यावरील भाष्य लेखांच्या स्वरुपात मांडले होते. त्या लेखांचे संकलन ओबीसी फॅक्टर या पुस्तकात केले गेले आहे. ओबीसींवरील अन्याय, ओबीसींची जबाबदारी, ओबीसी नेते व त्यांची वक्तव्ये आणि त्याचे होणारे व होत असलेले परिणाम, ओबीसींची सद्यस्थिती, बहुजन संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज-महात्मा फुले-राजर्षी शाहू महाराज-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार, आरक्षण वास्तव, आरक्षण राजकारण, ओबीसी विरोधाचे वास्तव, समता-समरसता वास्तव… अशा अनेकविध विषयांवर परखड भाष्य करणारे लेख यात आहेत.

COMMENTS