Homeताज्या बातम्यादेश

देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारावर

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशात काही तासांमध्ये दोन हजार नवे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पुढे गेला आहे. देश

Sushant Singh Rajput Case मध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढणार | ‘Filmi Masala’ | LokNews24
मतदान न करणार्‍या शिक्षक मतदारांवर कारवाई होणार का ?
इंधन दरवाढीमुळे फटाके महागले (Video)

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशात काही तासांमध्ये दोन हजार नवे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पुढे गेला आहे. देशात सोमवारी 1805 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे 1500 नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. सातत्याने वाढत्या कोरोनाबाधितांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
देशात सध्या 10 हजार 300 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. देशात गेल्या 24 तासांत 932 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच मागील 24 तासांत 1805 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 0.02 टक्के आहे. देशात आतापर्यंत 4,41,64,815 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. कोविड विषाणू संसर्ग अजूनही सुरुच आहे. कोरोनाच्या एक्सबीबी 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे. दरम्यान, अलिकडे कोरोना विषाणू आणि व्हायरल एच-3एन-2 इन्फ्लूएंझा या दुहेरी आजाराला लोक बळी पडत आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एच-3एन-2  फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले आहे.

COMMENTS