धर्मसत्तेवर राजसत्तेचा अंकुश हवा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

धर्मसत्तेवर राजसत्तेचा अंकुश हवा

भारतीय संसदीय लोकशाहीत धर्मसत्तेवर राजसत्तेचा अंकुश आहे हे खरे, पण त्याची व्याप्ती वाढली पाहिजे. धर्माचं रस्त्यावरील प्रदर्शन हे किळसवाणं असत. नाशिकम

मार्च एन्ड आणि विकास
राजकीय धुराळा
आम्ही मूकनायकाचे वारसदार

भारतीय संसदीय लोकशाहीत धर्मसत्तेवर राजसत्तेचा अंकुश आहे हे खरे, पण त्याची व्याप्ती वाढली पाहिजे. धर्माचं रस्त्यावरील प्रदर्शन हे किळसवाणं असत. नाशिकमध्ये असाच किळसवाणा प्रकार सर्वानी पाहिला. नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळाच्या वादातून मार्ग काढण्यासाठी धर्मसभा बोलविण्यात आलेली आहे. हनुमानाचे जन्मस्थान नाशिकमध्ये की कर्नाटकात असा हा वाद. यामध्ये त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे निघणारा कर्नाटकच्या साधू गोविंदानंद यांचा रथ रोखण्यासाठी नाशिकमधील अंजनेरीत साधुमहंतांसह ग्रामस्थांनी बेकायदेशीर रास्ता रोको केला. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी गोविंदानंद यांचा रथ बंदोबस्तात नाशिककडे रवाना केला खरा पण कारवाई शून्य. धर्माच रस्त्यावरील प्रदर्शन कशासाठी? पोलिसांनी या प्रकरणी उपस्थित सर्व साधू- संत, महंतावर गुन्हे दाखल करणे न्याय्य होईल.आपण ज्या व्यवस्थेत राहतो ती व्यवस्था कायद्यावर चालते. ती धर्मावर चालत नाही. महाराष्ट्रात आणि देशात साधू- संत, महंतांचे अश्लील चाळे सर्वसृत आहेत. त्याला काही साधू- संत, महंत अपवाद असतील. विवेकी विचार सांगणारे आणि आचरणात आणणारे साधू- संत, महंत आपल्याकडे आहेत हे कुणालाही नाकारता येणार नाही. पण नाशिकच्याच कुंभमेळाव्यात नग्न डान्स करणारे गांजा फुके साधू- संत, महंत सर्वानी पाहिले आहेत. काही दिवसापूर्वी औरंगाबादच्या रामायणाचार्य साधू- संतांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. आता अशा साधू- संतांचा काय आदर्श घ्यायचा? काही साधू- संत बलात्कार प्रकरणात झेलमध्ये आहेत. हे असे का घडते? तर याला जबाबदार आहे आपली प्रशासन व्यवस्था. धर्माच्या नावाने नंगानाच करणाऱ्या अशा साधू संतांवर जो अंकुश पाहिजे तो राहिलेला नाही. हे लोकशाहीला घातक आहे. भारतात हजारो वर्षाची धर्माची अन्यायकारक विषमतावादी व्यवस्था २६ जानेवारी १९५० साली संपुष्ठात येऊन समता, स्वातंत्र, न्याय देणारे संविधान देशाला लागू झाले. तेव्हापासून अविवेकाला मूठमाती देऊन विवेकी जीवन पद्धतीचा भारतीय लोकांनी स्विकार केला. पण जुन्या कर्मठ व्यवस्थेने अद्याप आपल्या लोकशाहीचा पाठलाग सोडलेला नाही. या अविवेकी व्यवस्थेचे कारनामे अद्यापही सुरूच आहेत. त्यामुळे या देशात खरा वाद आहे तो विवेकवाद विरुद्ध अविवेकवाद यांचा. अविवेकी लोक धर्माच्या माध्यमातून लोकांना श्रद्धाळू आणि अंधश्रद्धाळू बनवतात आणि शोषण करतात. नागरिकांचे धर्मामधून होणारे शोषण सरकारने थांबवले पाहिजे. भारतात श्रद्धेचे सर्वाधिक बळी आहेत. प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धा असते हे सर्वानी समजून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भारतात सर्वाधिक स्वार्थ हा प्रतिष्ठेचा आहे. नाशिकमधील साधू- संत, महंत यांचा धर्मसभेत जो वाद झाला तो आसनावर बसण्यावरून. आसनावर बसण्यात आपल्याकडे प्रतिष्ठा मानली जाते. हे या देशाचं खूप मोठं दुर्दैव आहे. देशात प्रतिष्ठेच्या महारोगाचे सार्वत्रीकीकरण झालेले आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवृत्तीनंतर खासदार व्हावं वाटत. याच्या पुढे जाऊन पाहिले तर आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई निवृत्तीनंतर खासदार झाले. यापेक्षा मोठे देशाचे दुर्दैव काय असू शकते? किंबहुना प्रतिष्ठेसाठी केलेलं हे घाणेरडे, किळसवाणे राजकारण आहे. याला वैतागून आपल्या देशातील विद्वान लोक पाश्चत्य देशात जाऊन राहतात. किंबहुना त्यांच्या विद्वत्तेचा देशाला फायदा झाला पाहिजे. पण क्रिकेट पाहण्यामध्ये जसे आपल्याकडे विद्वान लोक आहेत तसेच राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये महाविद्वान लोक आहेत. त्यामुळे भारतात संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था सांभाळू शकणारा किंवा तिला मजबूत करू शकणारा विद्वान अर्थतज्ज्ञ पाश्चत्य देशात जाऊन प्राद्यापकांची नौकरी करतात हे सत्य आहे. एवढी आपली व्यवस्था ग्रेट आहे. घटनाकाराने सर्व धर्माचा अभ्यास करून या देशाला एक संस्कृती दिली. आपल्या संसदीय लोकशाहीत सरकारी कार्यालयात पूजा- अर्चा होते. यावरून लोकशाही किती खिळखिळी केली गेली याचा प्रत्यय येतो. सरकारने धर्माचा समाजावरील परिणाम कमी करायला पाहिजे पण तसे होतांना दिसत नाही. धर्मसत्तेची आणि राजसत्तेची फारकत झालेली आहे हे आपले धोरणकर्ते विसरून गेलेले आहेत. नाशिकमध्ये धर्मसभेवर काही लोकांनी बहिष्कार टाकला ते योग्यच. पण धर्माच्या नावाने देशात दंगे घडवले जातात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे धर्मसत्तेवर राजसत्तेचा अंकुश हवा. आपल्या धोरणकर्त्यांना तशी अक्कल यावी ही अपेक्षा.

COMMENTS