Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेचा विनयभंग तरी गुन्ह्यात नोंद नाही

कोपरगाव ः कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील गुन्ह्यात आरोपींच्या आपला विनयभंग केला असताना कोपरगाव तालुका पोलिसांनी वाळूचोर आरोपींना अभय देण्या

महिलेला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल
मुलीला जमिनीच्या वादातून जिवंत गाडण्याचा प्रयत्न
वाहनावर कारवाई केल्याने वाहतूक पोलिसाला चक्क नेले 800 मीटर फरपटत .

कोपरगाव ः कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील गुन्ह्यात आरोपींच्या आपला विनयभंग केला असताना कोपरगाव तालुका पोलिसांनी वाळूचोर आरोपींना अभय देण्याच्या उद्देशाने सदर गुन्ह्याचे कलम लावले नसून ते वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्वरित लावावे अशी मागणी मळेगाव थंडी येथील फिर्यादीने व बाधित महिलेने तालुका पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे मळेगाव थडी परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दि. 03 जून रोजी वाळूचोरीची माहिती कोपरगाव तहसील आणि अधिकार्‍यांना देतात या संशयावरून मालेगाव येथून आपल्या कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे घरी जाणार्‍या एक फिर्यादी तरुणाला रस्त्यात अडवून 03 मे रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास रवंदा चौकात यांच्या ओळखीचे आरोपी व त्याचे काही अनोळखी सहकारी उभे होते. त्यांनी फिर्यादी तरुणाला हाक मारली व बोलवून घेतले होते.व तुझ्या आई वडिलांना फोन कर व बोलावून घे अस सांगीतले होते. त्यानुसार आपण आपल्या आई वडिलांना बोलावून घेतले होते.व त्यांना शिवीगाळ आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण वजीवे मारण्याची धमकी दिली होती. व सदर तरुणाच्या आईलाही मारहाण करून तिची साडी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आपण तशी माहिती फिर्यादी तरुणाने व सदर महिलेने पोलिसांना दिली होती. मात्र संबंधित पोलीस अधिकार्‍यांनी त्याची दखल घेतली नाही व आरोपींना मदत होईल असे वर्तन केले असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा क्र.214/2024 भा.द.वि.कलम.143, 323, 504, 506 प्रमाणे दाखल केला होता.मात्र यात सदर महिलेचा विनयभंग केला असताना त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही असा या महिलेचा आरोप आहे.परिणामस्वरूप या गुन्ह्यात कलम वाढविण्याची मागणी नोंदवली नाही असा आरोप सदर बाधित महिलेने लेखी अर्जाद्वारे नुकताच केला आहे.मात्र यात अर्ज फिर्यादीचे नावाने केला असून सदर अर्जावर सही मात्र बाधित महिलेनं केली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधीकारी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

COMMENTS