Homeताज्या बातम्यादेश

लग्नाचा मंडप पतंगासारखा हवेत उडाला

मध्य प्रदेश प्रतिनिधी - मध्य प्रदेश च्या खरगोनमध्ये वावटळीमुळे लग्नाचा एक मंडप लोखंडी पाईपसह पतंगासारखा हवेत उडाल्याची घटना घडली आहे. काही ज

राज्यपालांना शिवप्रेमींनी दाखवले काळे झेंडे ! | LOKNews24
मुस्लीम कब्रस्थानसाठी 2.25 कोटींच्या निधीची मान्यता
दक्षिण नगर जिल्ह्यातील रस्ते आता दुरुस्त होणार ; केंद्र सरकारने मंजूर केले 84 कोटी

मध्य प्रदेश प्रतिनिधी – मध्य प्रदेश च्या खरगोनमध्ये वावटळीमुळे लग्नाचा एक मंडप लोखंडी पाईपसह पतंगासारखा हवेत उडाल्याची घटना घडली आहे. काही जणांनी हा टेंट पकडण्याचा प्रयत्न केला. पण वावटळीमुळे धुळीचा लोट उठताच त्यांना पळता भूई थोडी झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 45 बाय 45 चा हा टेंट 200 फूट उंचीपर्यंत उडाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, खरगोन जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 70 किमी अंतरावरील झिरन्या ठाणे हद्दीतील कुसुंबिया गावात दुपारच्या सुमारास जबरदस्त वावटळ आली होती. त्यावेळी गावात लग्न समारंभाची तयारी सुरू होती. वावटळीमुळे टेंट उडत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी तो पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात धुळीच्या लोटासह वेगवान वावटळ आली. त्यात 45 बाय 45 चा टेंट एखाद्या पतंगासारखा जवळपास 200 फूट उंच उडाला.

COMMENTS