Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोडशीत शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकला

कराड / प्रतिनिधी : कराडहून अवघ्या तीन किलोमीटरवरील खोडशी येथे बिबट्या जेरबंद झाला. शिकारीसाठी लावलेल्या फासकीच्या जाळ्यात बिबट्या अडकला होता. पहा

जिल्ह्यात मनरेगा योजनेतून रेशीम उद्योगास प्रोत्साहन
जनावरांचे बाजारासह बैलगाडी शर्यती थांबल्याच पाहिजेत : आ. बाळासाहेब पाटील
सातारा जिल्हा वार्षिक योजनेसाठी 400 कोटी रुपयांचा निधी : उपमुख्यमंत्री

कराड / प्रतिनिधी : कराडहून अवघ्या तीन किलोमीटरवरील खोडशी येथे बिबट्या जेरबंद झाला. शिकारीसाठी लावलेल्या फासकीच्या जाळ्यात बिबट्या अडकला होता. पहाटे त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने ती गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ ती माहिती वन विभागाला कळवली. वन विभागही त्वरीत तेथे दाखल झाले. मात्र, दाट धुक्यामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. कृष्णा नदीच्या काठावरील सावकारवस्ती लगत घटना घडली.
फासकीत बिबट्याचा पाय अडकला होता. धुके कमी झाल्यानंतर वन विभागाने मदत कार्य राबवत बिबट्याची सुटका केली. त्याला कराडच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात आणण्यात आले आहे. त्याच्या पायावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय, वन अधिकारी व पर्यावरण प्रेमी त्यासाठी झटत आहेत.

COMMENTS