Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदु हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी वाठारस्टेशनच्या सुपुत्राकडून सजावट

वाठार स्टेशनचे असणारे शिवसैनिक अविराज पवार गेली 25 वर्षे मातोश्रीवर फुलांची आरास सकारताहेत.वाठारस्टेशन / वार्ताहर : हिंदु हृदय सम्राट असणारे स्वर

गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांच्या उजळणी पाढे उपक्रमास प्रतिसाद
संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव
चापडगावमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

वाठार स्टेशनचे असणारे शिवसैनिक अविराज पवार गेली 25 वर्षे मातोश्रीवर फुलांची आरास सकारताहेत.
वाठारस्टेशन / वार्ताहर : हिंदु हृदय सम्राट असणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशनचे सुपुत्र असणारे व मूळचे बिचकुले गावचे असणारे अविराज पवार यांनी स्मृतीस्थळावर फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
लहानपणापासूनच कट्टर शिवसैनिक असणारे अविराज पवार हे दादर येथील मातोश्री स्व. मीनाताई ठाकरे फुल मार्केटमधील मोठे युवा उद्योजक ओळखले जातात. लहानपणापासून कट्टर शिवसैनिक असणारे अविराज पवार हे हिंदु हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. गेली 25 वर्षे अविराज पवार व मनोज पुंडे हे दोन उद्योजक मित्र मातोश्रीवर दररोज फुलांची आरास करत आहेत. काल झालेल्या हिंदु हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 स्मृतिदिनाला या उद्योजक मित्रांनी डोळ्याचे पारणे फेडणारी आरास केली. अनेक मंत्री महोदयांनी फुलांच्या आराशीचे व सजावटीचे कौतुक केले. गेली 25 वर्षे मातोश्रीवर दररोज नित्याने फुले पोहचवून सजावट करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून अविराज पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्याचप्रमाणे अविराज पवार म्हटले की हाकेला धावणारा शिवसैनिक अशी ओळख असणारा उद्योजक म्हणून परिचित आहेत.

COMMENTS