अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील लिंगदेव गावामध्येमधे अहमदनगर जिल्हातील सर्वात मोठ्या संगीत आखाड्याने उत्साहात भगवान

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील लिंगदेव गावामध्येमधे अहमदनगर जिल्हातील सर्वात मोठ्या संगीत आखाड्याने उत्साहात भगवान लिंगेश्वराची यात्रा संपन्न झाली आहे.या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेली संगीत आखाडी (बोहडा) नृत्य बघण्यासाठी राज्यभरातून भावीक या ठिकाणी येत असतात सकाळी लिंगेशवर महादेवाची पुजा करुन भगवान लिंगेश्वराच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाते यावेळी लेझीम,आदीवासी नृत्य,अश्व नृत्य आदी कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.
तर संध्याकाळी मुख्य आकर्षण असलेली संगीत आखाडी सुरु होते यात रामायण,महाभारत,आदी प्रचिन ग्रंथातील महापुरुषांचे पात्र सोंग घेतले जातात,हि या गावची शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे ही पात्रे घेण्यासाठी गावात लिलाव घेतला जातो यावर्षीचा या सोंगाचा लिलाव १० लाख ८० हजार ईतका झाला आहे या यात्रेसाठी गावातील तरुन,परदेशात नोकरीसाठी असलेले तसेच पुने मुंबई आदी ठिकाणी असलेले तरुण आवर्जून हजर असतात.ऐकुनच लिंगेश्वराचे दर्शन घेन्यासाठी येथे लाखोंची गर्दी होत असते.आलेल्या प्रत्येक भाविकाला येथे महाप्रदास मोफत दिला जातो. घ्या संगीत आखाड्यात देव देवता राक्षस यांचे सोंग गावातील लोख घेऊन सर्वांचे मनोरंजन करात रात्रभर हे ही संगीत आखाडी सुरू असते.दुसर्या दिवशी जंगी हंगामा झाल्यानंतर या यात्रेची सांगता होते.
COMMENTS