Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रश्‍न मंत्रिपदाचा नसून अवहेलनेचा : भुजबळ ; राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांवर हल्लाबोल

नाशिक/मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यानंतर भुजबळांनी मंगळवारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर टीका केली

 शेतात विमान कोसळलं, तांत्रिक बिघाडामुळे अपघात 
सांगली जिल्ह्यातील उमदी येथे आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
मी कारवाईला घाबरत नाही व इतरांना उत्तर द्यायला बांधिल नाही ; खा. विखेंनी केले स्पष्टीकरण, रेमडीसीवीर इंजेक्शन प्रकरण गाजणार

नाशिक/मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यानंतर भुजबळांनी मंगळवारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही असतांना माझा पत्ता कट केला असा आरोप देखील भुजबळ यांनी केला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रिपद कुणी नाकारले हे शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि कुणीही नाकारले तरी शेवटी पक्ष प्रमुखाचा निर्णय महत्त्वाचा असतो. भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. आणि बाकीचे काही असले तरी आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत. ते त्यांचा निर्णय घेत असतात. प्रत्येकालाच मंत्रिपद हवे असते. पण यासंबंधी प्रश्‍न मंत्रिपदाचा नाही तर ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. यासंबंधी मी उद्या तुम्हाला आणखी काही सांगेन, असे भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेत केवळ माझा कोणताही हस्तक्षेप नसतो. आमच्या पक्षात केवळ अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, असा आरोप देखील भुजबळ यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवार मला विश्‍वासात घेत होते, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे की नाही हे कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार असल्याचेही संकेत दिले. त्यानंतर आता त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

COMMENTS