Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांची प्रकृती स्थिर

डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला

बारामती : बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात अचानक शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांना विश्रांती घे

राज्यात भाजपविरोधात असंतोष ः शरद पवार
मविआ एकत्र निवडणूका लढवणार ः खा. शरद पवार
शरद पवारांच्या भेटीनंतर निवडणूक चाणक्य राहुल गांधीच्या भेटीला l पहा LokNews24

बारामती : बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात अचानक शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले होते. दरम्यान, यामुळे रविवारी त्यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. शरद पवार  हे बारामती येथे असून त्यांची प्रकृती ही स्थिर आहे. दरम्यान, त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी बारामती येथील गोविंद बाग येथे नागरिकांची गर्दी झाली होती.
बारामती येथे शनिवारी शरद पवार यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात त्यांना त्रास सुरू झाल्याने या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. तब्बल पाऊण तास त्यांची तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच आज देखील त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शरद पवार यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील देखील रविवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त पवार कुटुंबीय हे बारामती येथे एकत्र आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांची हृदयरोग तज्ञ डॉक्टर रमेश भोईटे यांनी तपासणी केली. त्यांचा एसीजी काढण्यात आला. सततच्या कार्यक्रमामुळे आणि विश्रांती न घेतल्यामुळे पवार यांना थकवा आला असल्याने त्यांनी विश्रांती घ्यावी असे डॉक्टरांनी सांगितले.

COMMENTS