Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उन्हाचा चटका वाढणार

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर ओसरला असून, आता उन्हाचा चटका वाढतांना दिसून येत आहे. मार्च महि

जात पंचायतने एक रुपयात फोनवरच केला महिलेचा घटस्फ़ोट…
तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, १७ जून २०२२ | LOKNews24 |
मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना चक्क आली इंग्लिश प्रश्नपत्रिका

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर ओसरला असून, आता उन्हाचा चटका वाढतांना दिसून येत आहे. मार्च महिना संपत असताना आता राज्यातील हवामानात मोठे फेरबदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे आता उन्हाचा चटका वाढणार आहे.
मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होत आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मार्च अखेरपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय कोकण, मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या झळा वाढणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळले असून कमाल तापमानात 3 ते 4 अंशाने वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्यात सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी 11 ते 3 वाजता घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. याशिवाय वेळोवेळी आवश्यतेनुसार पाणी पिण्याचा सल्ला वैद्यकीय जाणकारांनी दिला आहे.

COMMENTS