देऊळगावराजा प्रतिनिधी:- देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस बू येथून रात्रंदिवस अवैध रेती वाहतूक होत असल्यामुळे ,पावसळा सुरू असल्याने गावामधून रेती ट
देऊळगावराजा प्रतिनिधी:- देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस बू येथून रात्रंदिवस अवैध रेती वाहतूक होत असल्यामुळे ,पावसळा सुरू असल्याने गावामधून रेती टिपर जवळपास 40/45टन क्षमतेचे वाहतूक रात्रंदिवस चालात असल्यामुळेच पावसाचे पाणी पडल्याने रस्त्यावरील साचलेले पाणी यातून मार्ग काढून रेती वाहतूक होत आहे यामुळे गावातील अंगणवाडी, जि प मराठी-ऊर्दू शाळा आरोग्य उपकेंद्र, यशवंत माध्यमिक महाविद्यालय व भगवान बाबा चौकातून अवैध रेती वाहतूक रात्रंदिवस होत आसल्याने रस्ते कमी रूदीचे आहे यावरून डबल वहान किंवा बैलगाडी ये जा करताना जीव धोक्यात घालून वाहतूक करावे लागतात. मारुती मंदिर पासून ग्रामपंचायत सदस्य रामदास गावडे यांच्या घरापर्यंत रस्त्यावरील वाहतूक खुप धोकादायक होवून बसलेली आहेत अंगणवाडी जवळ भयंकर रस्ता खराब झालेला असुन देखील अंगणवाडीला खेटून रेती वाहतूक होते या अवैध रेती वाहतूक मुळे डिग्रस बू येथील जनतेचे जीवन मरणाच्या यातना सहन करावे लागत असल्याने डिग्रस बू ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी दि 23 जुन रोजी मासिक ठराव घेऊन महसूल विभाग यांना निवेदन देण्यात आले परंतू यावर कोणतीच कारवाई झाली नाही.
याउलट खनिज विभागाकडून डिग्रस बू येथे रेती साठा दाखवून 600 ब्रास रेती उचलण्याची परवानगी दिली असल्याने डिग्रस बू दिनांक 19 जुलाई रोजी मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात सर्रासपणे अवैध रेती वाहतूक सुरू आहे. सदरील रेती वाहतूक ट्रॅक्टर, टिपर द्वारा अंगणवाडी,जि प माराठी, उर्दू शाळ ,आरोग्य उपकेंद्र, यशवंत माध्यमिक विद्यालय समोरून होत असून यामुळे लहान मुलांना व नागरिकाची जीवत हानी होण्याची दाट शक्यता आहे, यापूर्वी ग्रामपंचायत ने अवैध वाहतूक रस्त्यावरील लोखंडे खांब रोहून बंद केले होते परंतू याल्या न जुमाता रेतीवाल्यानी त्याचच बाजूने दुसरा रस्ता तयार करून रेती वाहतूक करत आहे या अगोदर ही वरिष्ठांना निवेदन देऊन कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
उपसरपंच सैय्यद रशीद सैय्यद लतीफ -डिग्रस बू येथे रेती साठा कोठेच उपलब्ध नाही व असी ग्रामपंचायत मधे कोणतीच नोंद करण्यात आलेली नाही तरी देखील गैवन खनिज वाल्यांनी जवळपास 600 ब्रास साठा दाखवून रेती साठा उचलण्याची परवानगी दिली कसी यात रेती माफियाराज व महसूल विभाग, याच्यात संगनमत होवून खोटी रेती साठा दाखवून रेती वाहतूक करण्याची परवानणी दिल्याने गावातील लोकांच्या जीवितास खेळने बनवून लोकांचे जनजीवन विस्कळीत करण्याचे काम करत आहे यावेळेस मा जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी डिग्रस बू ग्रामपंचायत सरपंच सौ मीनाताई गणेश वाळ (फखीरादाद वाळ) उपसरपंच सैय्यद रशीद सैय्यद लतीफ (भैय्या) ग्रामपंचायत सदस्य मुना वाघ, बाबूलाल सुवालाल वाळ, सैय्यद कलीम, रामदास गावडे, अमोल अंभोरे, डिग्रस बू येथील नुरा मजीद चे समन्वयक सैय्यद मुश्ताक सैय्यद पाशू, सामाजिक कार्याकर्ते अशोक शेगर, सोपान वाघ यांनी आज रोजी मा जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले
COMMENTS