मुंबई ः मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्याने सोडवायला हवा, याचबरोबर वर्ष सरता-सरता राज्यातील बेकायदा सरकारला निरोप द

मुंबई ः मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्याने सोडवायला हवा, याचबरोबर वर्ष सरता-सरता राज्यातील बेकायदा सरकारला निरोप दिला जाईल, असा दावाही माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, गद्दारांची बाजू घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडे वेळ आहे. पण न्याय्यहक्कांसाठी लढणार्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यास वेळ नाही. त्यांच्याकडून अपेक्षा काय करायची? सत्तेत असलेले आमदार, खासदार राजीनामे कशाला देत आहेत? त्यांनी प्रश्न सोडवले पाहिजे. विधानसभेत, संसदेत जाऊन प्रश्न सोडवा ना ? असे आवाहनच उद्धव ठाकरे यांनी केले. तसेचहिंसाचार व जाळपोळ करून काही होणार नाही. जिथे हा प्रश्न सुटेल, तिथेच तो मांडला पाहिजे. पंतप्रधानांकडेच जायला हवे. ते ऐकत नसतील तर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. आमच्या सरकारला दोष देण्यात काही अर्थ नाही. आमचे सरकार आले तेव्हाच आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात होता. आधीच्या सरकारने नेमलेले वकीलच आम्ही ठेवले. सर्व प्रकारचे सहकार्य त्यांना आम्ही केल्याचा दावा देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
COMMENTS