पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू होता जुगाराचा अड्डा…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू होता जुगाराचा अड्डा…

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील माळीवाड्यातील पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून 19 हजार 80

१०० सेकंदात १५ ठळक बातम्या | सुपरफास्ट महाराष्ट्र | Marathi News | LokNews24
नामदार थोरात यांनी केली गंगामाई घाट परिसराची पाहणी
उपजिल्हा रुग्णालय व व्यापारी संकुल कामाची आमदार काळेंकडून पाहणी

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील माळीवाड्यातील पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून 19 हजार 800 रूपयांची रक्कम हस्तगत करीत 5 जुगार्‍यांवर कारवाई केली. ही कारवाई रविवारी (दि.2) सायंकाळी पावणेसात वाजता करण्यात आली.
चंद्रकांत लक्ष्मण वाघमारे (वय 47, रा. माळीवाडा), सागर सुरेश केवटे (वय 40, रा. माळीवाडा), गणेश रामचंद्र रजपूत (वय 59, रा. भिंगार, गवळीवाडा), प्रशांत चंद्रकांत पवार (वय 21, रा. मल्हार चौक, स्टेशन रोड) व अजय दत्तात्रय बहिरवाडे (वय 32, रा. माळीवाडा) अशी जुगार्‍यांची नावे आहेत. माळीवाडा येथील एका लॉजच्या मागील बाजूस पडक्या वाड्याच्या आडोशाला काहीजण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक पिंगळे, पोलिस नाईक सलिम शेख, धोत्रे, योगेश भिंगारदिवे, कॉन्स्टेबल गोमसाळे, दीपक रोहकले, अभय कदम, नितीन शिंदे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता, 5 जण जुुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या अंगझडतीत 19 हजार 800 रुपयांची रक्कम आढळून आली. यासंदर्भात कॉन्स्टेबल अमोल गाडे यांनी फिर्याद दिली आहे.

COMMENTS