भविष्य सांगणार्‍या पोलिसाचेच…भविष्य अंधारात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भविष्य सांगणार्‍या पोलिसाचेच…भविष्य अंधारात

पत्नीने घेतली पोलिसाकडे धाव, पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाकडे लक्ष

अहमदनगर/प्रतिनिधी ः खाकी ड़्रेस घालून पोलिसी सेवा करता करता नागरिकांचे भविष्य सांगणार्‍या पोलिसाचेच…भविष्य अंधारात जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे. त्य

मनामनात श्रीराम भक्तीची ज्योत पेटवा – प्रदीप महाराज नलावडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाच्या जिल्हा संघटकपदी दीपक परदेशी यांची नियुक्ती 
बॉलिवूड अभिनेत्रीची वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ः खाकी ड़्रेस घालून पोलिसी सेवा करता करता नागरिकांचे भविष्य सांगणार्‍या पोलिसाचेच…भविष्य अंधारात जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे. त्याने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या पत्नीनेच केली आहे. त्यामुळे आता याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील काय निर्णय घेतात, याची उत्सुकता पोलिस खात्यात आहे.
शासन सेवेत असताना कोणतीही परवानगी न घेता ज्योतिष्य विषयाचा अभ्यास करून लोकांचे भविष्य पाहून लाखोे रुपये कमाई करता करता जादूचेही प्रयोग करून त्याद्वारेही पैसे कमविणार्‍या पोलिसाने 2005 नंतर झालेल्या तिसर्‍या अपत्याची माहिती शासनापासून लपवून ठेवून शासनाचे विविध नियम, निर्णय, अधिसूचना तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी संजय साळवी (नियुक्ती, पोलीस मुख्यालय) यास तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी त्याची पत्नी विमल संजय साळवी यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात विमल साळवी यांनी म्हटले आहे की, संजय विश्‍वनाथ साळवी (मूळ राहणार कान्हूर पठार, तालुका पारनेर) हे 20 जानेवारी 1999 रोजी शासन सेवेत पोलिस कॉन्स्टेबल या पदावर रुजू झाले. त्यानंतर 2 फेब्रुवारी 1993 रोजी त्यांचा विमल साळवी यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांना प्रतीक व श्रुतिका अशी दोन अपत्ये झाली. शासन सेवेत असताना साळवी यांनी शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ज्योतिष अभ्यास मंडळ संस्था (पुणे) येथे 12 नोव्हेंबर 2002 रोजी फलज्योतिष या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर शासन सेवेत असताना लोकांचे भविष्य पाहण्याचे काम सुरू केले. अनेकांकडून 50 हजार ते एक लाख रुपये घेतले. या दरम्यानच्या काळात ते जादूचे प्रयोगसुद्धा करून त्याद्वारेसुद्धा पैसे कमवत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
भविष्य पाहत असताना भिंगारमधील एका 26 वर्षीय महिलेचे भविष्य पाहताना त्यांनी तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी संपर्क व संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती महिला गर्भवती राहिल्याने व तिला 14 मे 2012 रोजी अपत्य झाले. त्यामुळे संजय साळवी यांनी तिसरे अपत्य झाल्याचे लपवून शासन सेवेत पोलिस दलात असूनसुद्धा शासन नियम, निर्णय व अधिसूचनेचा भंग केला आहे. लोकसंख्या नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणार्‍या विविध संवर्गातील कर्मचार्‍यांना 28 मार्च 2005 नंतर तिसरे अपत्य झाल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे. या नियमाचा साळवी यांनी भंग केला आहे. पोलिस दलातील सेवा पुस्तकात विमल साळवी यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्याचे नोंदवले असून त्या पुस्तकात पहिल्या दोन अपत्यांची नोंद आहे. मात्र, 2012 मध्ये झालेल्या तिसर्‍या अपत्याबाबत शासनाला कळविले नसून, शासनाची फसवणूक केली. तसेच ज्योतिष पाहण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लोकांच्या भावनेशी खेळत असून लोकांकडून मोठ्या प्रमाणात लूट करीत आहे व जादूचे प्रयोग करून पैसेही कमवत आहे. त्यामुळे संजय साळवी यांना शासन सेवेतून बडतर्फ करावे तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विमल साळवी यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

तर, डीएनए टेस्ट करावी
संजय साळवी यांनी तिसरे अपत्य झाल्याचे नाकारल्यास त्यांच्या तिन्ही अपत्यांची डीएनए टेस्ट करावी, अशीही विनंती विमल साळवी यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

COMMENTS