Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संपावरील शिक्षकांनी भरलेल्या चार शाळा दिल्या चक्क सोडून…

मुलांनी आनंदात धरला घरचा रस्ता

अहमदनगर/प्रतिनिधी ः जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संपावर असलेल्या शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळा सोडून देण्याचे आंदोलन सुरू केले आहे. नग

श्री क्षेत्र सरलाबेट येथील दिंडीचे राहुरी फॅक्टरीत स्वागत
एकलव्य महिला आघाडीची बोलकी येथे बैठक उत्साहात
माजी नगरसेवक कैलास गिरवलेंना मारहाण करणार्‍या पोलिसांवर गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी ः जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संपावर असलेल्या शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळा सोडून देण्याचे आंदोलन सुरू केले आहे. नगर शहरातील राष्ट्रीय पाठशाळा व शिशु संगोपन गुगळे हायस्कूल तसेच नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालय व शिंगवे नाईक येथील न्यू इंग्लिश स्कूल भरविण्यात आल्याचे आंदोलक शिक्षकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या सर्व भरलेल्या शाळा सोडून दिल्या व वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलांना घरी जाण्यास सांगितले. अचानक मिळालेल्या या सुट्टीमुळे मुलांनी आनंदाने घरचा रस्ता धरला.

जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी (दि.17 मार्च) प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी शहरासह नगर तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन तेथील शिक्षकांनी भरविलेल्या शाळा सोडून देण्यात आल्या. सर्व शिक्षक व शिक्षकेतरांनी संपात सहभागी होवून शाळा बंद ठेवण्याचे आवाहन समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले. जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, अमोद नलगे, खासगी प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरमुडे, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सखाराम गारुडकर, नंदकुमार शितोळे, भाऊसाहेब जिवडे, शिक्षक भारतीचे बाबासाहेब लोंढे, गोवर्धन पांडुळे, दिलीप बोठे, संतोष ठाणगे, राहुल झावरे, नितीन गायकवाड, बाळासाहेब कुलकर्णी, प्रसाद सामलेटी, नंदकुमार हंबर्डे यांनी शुक्रवारी सकाळी शहर व नगर तालुक्यातील विविध शाळांना भेटी दिल्या व विद्यार्थ्यांनी भरलेल्या या शाळा गुरुजींनी सोडल्या आणि जुनी पेन्शनसाठी शाळा बंद ठेवून संपात उतरण्याचे आवाहन केले. दरम्यान, समन्वय समितीच्या माध्यमातून संप यशस्वी केला जात आहे. जुनी पेन्शनसाठी सर्व शिक्षक, कर्मचारी पोटतिडीकीने आंदोलनात उतरले आहे. जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय आंदोलनातून माघार नसून सर्व शिक्षक-शिक्षकेतरांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालकांना घेतले बोलावून – प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी शाळा भेटीच्यावेळी शाळा सुरू असल्याचे पाहिल्यावर तेथील शिक्षकांना शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले तसेच शाळेत आलेल्या मुलांना घरी परत पाठवण्यासाठी आंदोलक शिक्षकांनी पालकांना फोन करून मुलांना घेऊन जाण्यासाठीही बोलावून घेतले. दरम्यान, काही ठिकाणी वसतीगृहातील शाळा देखील भरविल्या जात असल्याचे निदर्शनास आले असल्याने शालेय प्रशासनाला वर्ग न भरविता मुलांना वसतीगृहातच थांबवण्याची विनंती करण्यात आली असल्याचे आंदोलक शिक्षकांनी सांगितले.

COMMENTS