Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मविआचे भवितव्य जागा वाटपानंतरच होणार स्पष्ट

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा शरद पवारांचा खुलासा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडद्याआडून हालचाली सुरू असून, शरद पवार यांनी महाविकास आघाडी आज आहे, उद्या असेल की नाही, माहित न

शेती क्षेत्रामध्ये आधुनिकता आणली पाहिजे : खा. शरद पवार
डेंटल कॉलेज एनएसएस विद्यार्थ्यांचा दंडकारण्यात सक्रिय सहभाग
शैक्षणिक असमतोल

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडद्याआडून हालचाली सुरू असून, शरद पवार यांनी महाविकास आघाडी आज आहे, उद्या असेल की नाही, माहित नसल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असून, अद्याप जागा वाटप झाले नसल्यामुळे मी असे वक्तव्य केल्याचा खुलासा शरद पवारांनी सोमवारी केला.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाबद्दल बोलतांना शरद पवार म्हणाले की, वंचित आघाडीसोबत जी चर्चा झाली, ती फक्त कर्नाटकातल्या मर्यादित जागांशिवाय दुसरी कसलिही नाही. आणि बाकी आता आम्ही एकत्र लढणार वगैरे. आज आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे. पण इच्छाच फक्त पुरेशी नसते. जागांचे वाटप. त्यातले काही इश्यू आहेत की नाही. हे अजून केलेच नाही. तर कसे सांगता येईल, असे उत्तर दिले होते. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत महाविकास आघाडी फुटणार का, याची चर्चा सुरू होती. पवारांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी फुटणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा शरद पवार यांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, असे स्पष्टीकरण दिले. पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत अजून जागावाटप निश्‍चित नाही. मात्र, मविआ टिकून रहावी हा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी पवारांनी आपल्या वक्तव्यावरून सुरू झालेली चर्चा आणि डॅमेज कंट्रोल थांबण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पुढे खरेच काय होणार, याची उत्सुकता आहे.

आघाडीत कोणतीही फूट नाही ः संजय राऊत- शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की,’मविआ’ उभारणीत शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र यावे, ही शरद पवारांची इच्छा होती. तिन्ही पक्ष एकत्र राहिले तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा पराभव करू व लोकसभेची निवडणूकही मोठ्या फरकाने जिंकू, असा शरद पवारांना विश्‍वास आहे. त्यामुळे ’मविआ’ तुटावी, अशी शरद पवारांची भूमिका असेल, असे अजिबात वाटत नसल्याचे राऊत म्हणाले.

वज्रमूठ सभेला शरद पवार राहणार गैरहजर- भाजपविरोधात वातावरण तयार करण्यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा घेण्यात येत आहे.यापैकी पहिली सभा ही संभाजीनगर येथे झाली. त्यानंतर दुसरी सभा नागपुरात झाली. आता तिसरी सभा ही येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे महाविकास आघाडीच्या आगामी मुंबईतील वज्रमूठ सभेत हजर राहणार नाहीत. विशेष म्हणजे फक्त मुंबईच नाही तर राज्यात होणार्‍या मविआच्या इतर कोणत्याही वज्रमूठ सभेमध्ये शरद पवार हजर राहणार नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत तीनही पक्षांचे दोन-दोन नेते संबोधित करणार आहेत.

COMMENTS