Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ताधार्‍यांची श्रद्धा अयोध्येत, आमची शेतकर्‍यांसोबत

खा. शरद पवारांचा अयोध्या दौर्‍यावरून मुख्यमंत्री शिंदेंना टोला

नाशिक/प्रतिनिधी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयौध्या दौर्‍यावर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यां

प्रसिद्ध कंधारच्या उरुसाला उत्साहात सुरवात, हजारो भाविक संदल मध्ये सहभागी
६८ व्या मजल्यावरुन खाली पडून प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू
दुचाकीस्वाराला जखमी करून पळून जाणाऱ्या पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक/प्रतिनिधी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयौध्या दौर्‍यावर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेलक्या भाषेत टीका करतांना म्हटले आहे की, सत्ताधार्‍यांची श्रद्धा अयोध्येत असून, आमची श्रद्धा मात्र शेतकर्‍यांवर आहे. शेतकर्‍यांच्या नुकसानीशी आहे. शेतकर्‍यांच्या डोळ्यातील पाणी पुसत, संकटातून त्याला मदत कसे करता येईल, यावर आमची श्रद्धा असल्याची टीका पवारांनी केली आहे. देवरगाव येथे आदिवासी आश्रम शाळा इमारत व मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे. तिथे काँग्रेस सत्तेवर येणार आहे. लोकांना बदल हवा आहे. तो बदल भाजपाला घरी बसवणार आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. ते निर्यातीला प्रोत्साहन देत नाहीत तर आयातीला प्रोत्साहन देतात. शेतीमालाला चांगली किंमत दिली पाहिजे, बी बियाणे, पाणी दिले पाहिजे मात्र हे काम करण्यासाठी सरकार दुर्लक्ष करत आहे. शेतकरी हिताचे धोरण न आखणार्‍या या सरकारला आपल्याला बाजुला करावे लागणार देखील पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलतांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, आदिवासी समाजाच्या विकासासाठी शरद पवार यांनी राज्याच्या बजेटमध्ये 9 टक्के निधीची तरतूद कायम केली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. असे असले तरी आजही काही प्रमाणात आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले. आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणासाठी आश्रम शाळा वसतीगृह अतिशय महत्वाचे आहे. आदिवासींचे शिक्षणाचे प्रश्‍न सोडविले तर हा समाज व्यवस्थेत पुढे येऊ शकतो त्यामुळे आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

कर्नाटकात राष्ट्रवादी 5-6 जागा लढणार – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रस उतरणार असून, काही जागांवर आम्ही आमचे उमेदवार देणार आहोत. जास्त जागांवर आम्ही आपले उमेदवार देणार नसून कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्त येणार आहे. कर्नाटकात आमचे ध्येय महाराष्ट्र एकीकरण समिती आहे. त्या मराठी भाषिकांमध्ये मतभेद नकोत, एकवाक्यता कशी करता येईल. तसेच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मदत कशी होईल, अशी आमची भूमिका राहणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

सावरकरांच्या काही भूमिका अमान्य – राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करतांना म्हटले आहे की, सावरकरांच्या काही भूमिकेला आमचा पाठिंबा नाही, त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली ती आम्हांला मान्य नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. सावरकरांनी काही पुरोगामी विचार मांडले. जसे त्यांनी घरासमोर मंदिर बांधले आणि दलित पुजारी नेमला. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते.

COMMENTS