Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्यातील 86 ग्रामपंचायतींचा निवडणूकीचा बिगुल वाजला

पाटण / प्रतिनिधी : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. यामध्ये पाटण तालुक्यातील 86 ग्राम

खानापूर तालुक्यातील 8 ग्रामपंचायती बिनविरोध; 37 गावात काट्याची टक्कर
कराड पालिका अनुकंप प्रतिक्षा यादीतील कर्मचार्‍यांची नियुक्तीची प्रतिक्षा संपली
बसस्थानकात एसटीच्या चालकाकडून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

पाटण / प्रतिनिधी : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. यामध्ये पाटण तालुक्यातील 86 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दि 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पुन्हा तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार असून राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीपूर्वी होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीला मोठी रंगत येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यापासून धुमसत असलेली पाटण तालुक्यातील बंडाळीला गावा-गावात आता तोंड फुटणार आहे. त्यामुळे या निवडणूका वादळी होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या दरम्यान सादर केले जातील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.
पाटण तालुक्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे : हेळवाक, रासाटी, शिवंदेश्‍वर, गोकुळ तर्प हेळवाक, नाव, ढाणकल, काडोली, गोवारे, येराड, मणेरी, बनपेठवाडी, झाकडे, मारूल तर्फ पाटण, शिरळ, कराटे, लेंढोरी, गोठणे, आंब्रग, नाटोशी, काठी, कुसवडे, म्हावशी, अडुळ गावठाण, डिगेवाडी, अडुळपेठ, बीबी, केरळ, धडामवाडी, निवकणे, भारसाखळे, हुंबरवाडी, धजगांव, निसरे, आबदारवाडी, गिरेवाडी, शेडगेवाडी, उरूल, नाडे, मारूल हवेली, बहुले, गारवडे, वेताळवाडी, पाडळोशी, धायटी, डेरवण, दाढोली, नाणेगाव बु।, जाळगेवाडी, सडावाघापूर, माझगाव, माथणेवाडी, जाधववाडी, ढेबेवाडी, बनपूरी, आंबवडे खुर्द, भोसगाव, पाणेरी, कारळे, मराठवाडा, सणबुर, महिंद, घोटील, मत्रेवाडी, चौगुलेवाडी, साईकडे, ताईगडेवाडी, मालदन, साबळेवाडी, शेंडेवाडी, गलमेवाडी, चाळकेवाडी, वेखंडवाडी, राहुडे, नुने, भुडकेवाडी, कोंजवडे, कडवे खुर्द, कडवे बु।, आवार्डे, मरळोशी, निवडे, कळंबे, जळव, तोंडाशी, घोट, ढोरोशी या एकूण 86 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.

COMMENTS