चालकाला चक्कर आली व जीप खड्ड्यात गेली ; अपघातात दोन महिलासह तीन जखमी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालकाला चक्कर आली व जीप खड्ड्यात गेली ; अपघातात दोन महिलासह तीन जखमी

अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील निघोजकुंड ते निघोज जाणार्‍या रोडने भरधाव वेगात जाणार्‍या जीपवरील चालकाला चक्कर आल्याने त्याचे जीपवरील नियंत्रण

राहुरीत गावकीच्या सहकाराचे धुराडे पेटले
नदीत वाहून गेले होते दोन लहान भाऊ… मृतदेह सापडले
महात्मा गांधीजी जयंती दिनी वन नेशन वन रिझर्वेशन सत्याग्रह

अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील निघोजकुंड ते निघोज जाणार्‍या रोडने भरधाव वेगात जाणार्‍या जीपवरील चालकाला चक्कर आल्याने त्याचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पडली. या अपघातामध्ये पुणे जिल्ह्यातील दोन महिलांसह तिघेजण गंभीर जखमी झाले. पुणे जिल्ह्यातील खेड येथील भाविक पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या दर्शनासाठी येत असताना क्रूझर जीपच्या चालकास अचानक चक्कर आली व त्याचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या खड्ड्यामध्ये पडली. त्यात प्रवाशांपैकी चालक मिनीनाथ भोगाडे याच्यासह मीरा मांजरे व जानकाबाई मांजरे हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती निघोज प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर राजेंद्र घुले यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अ‍ॅम्ब्युलन्सला बोलावून तीनही जखमींना शिरूर (जि. पुणे) येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.

COMMENTS