ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचे निधन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचे निधन

मुंबई : प्रगतीशील लेखक चळवळीचे आधारवड, ज्येष्ठ कवी, कॉम्रेड सतीश काळसेकर यांचे शनिवारी पहाटे पेण येथे निधन झाले. ते बडोदा बँकेतून निवृत्त झाले होते.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमिवर प्रशासकीय इमारतीच्या परिसराची अधिकारी कर्मचार्‍यांकडून स्वच्छता
नागरिकांनी रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
औरंगजेबाचे भक्त राजकारण करु इच्छित; मात्र त्यांना याच मातीत गाडलं | LokNews24

मुंबई : प्रगतीशील लेखक चळवळीचे आधारवड, ज्येष्ठ कवी, कॉम्रेड सतीश काळसेकर यांचे शनिवारी पहाटे पेण येथे निधन झाले. ते बडोदा बँकेतून निवृत्त झाले होते. संघटनेत देखील ते सक्रिय होते. हिमालयातील अनेक प्रवास आयोजित करण्यात त्यांनी सतत पुढाकार घेतला होता. निसर्गप्रेमी ही त्यांची खास ओळख होती. चळवळीतील कार्यकर्त्यांना सांस्कृतिक अंगांनी प्रगत करणे यासाठी त्यांनी खूप पुढाकार घेतले होते. त्यांच्या निधनाने प्रगतीशील साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे तर खूप मोठे नुकसान झाले आहे. मराठी साहित्यातील कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, मार्क्सवादी चळवळीतील ते सक्रिय कार्यकर्ते होते. काळसेकर यांची साहित्य संपदा इंद्रियोपनिषद् (1971), साक्षात (1982), विलंबित (1997) हे कवितासंग्रह तसेच कविता:लेनिनसाठी (1977, लेनिनवरच्या विश्‍वातील कविता-अनुवाद व संपादन), नव्या वसाहतीत (2011, अरुण कमल यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद) हे अनुवाद प्रकाशित झाले आहेत.

COMMENTS