Homeताज्या बातम्यासंपादकीय

कृत्रिम बुद्धीमत्तेचे दुधारी शस्त्र

अलीकडच्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धीमत्ता हा शब्द अनेकांच्या कानावर सातत्याने पडतांना दिसून येत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे नेमके का, त

विषारी दारुचे बळी
सर्वसामान्यांचा विसर
संसदेचा आखाडा

अलीकडच्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धीमत्ता हा शब्द अनेकांच्या कानावर सातत्याने पडतांना दिसून येत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे नेमके का, त्याचा वापर कसा होणार, त्याचे दुष्परिणाम काय होणार हे, जाणून घेणे गरजेचे आहे. अश्मयुगीन मानवाला अग्निचा, चाकाचा शोध लागला आणि त्याचे आयुष्य बदलून गेले. तो प्रगत होत गेला. त्यानंतर औद्योगिक क्रांतीमुळे यंत्राच्या सहाय्याने मानवाने अतिरिक्त उत्पन्न घेवून, त्याची निर्यात इतर देशात सुरू केली. त्यानंतर तंत्रज्ञानाने या प्रगतीत मोठीच क्रांती केली. मात्र या सर्वांवर मात म्हणजे आता कृत्रिम बुद्धीमत्तेचे नवे युग अवतरतांना दिसून येत आहे. अनेक चित्रपटातून या कृत्रित बुद्धीमत्तेचे महत्व स्पष्ट केले आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे जसा फायदा होणार आहे, तसेच त्याचे दुष्परिणाम देखील वाढणार आहे. दुष्परिणाम वाढणार आहे, म्हणून मानवाने, शोध लावणे थोडीच थांबवले.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानव आणि इतर प्राण्यांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेपेक्षा (एआय) मशीनवर आधारित स्मार्ट वर्तन आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये एआयचे वर्णन ’स्मार्ट एजंट’ संशोधन म्हणून केले जाते: कोणतेही उपकरण जे त्याचे वातावरण समजून घेते आणि कृती करते जे त्याच्या यशस्वी होण्याची संधी वाढवते. सर्वसाधारणपणे, जेव्हा मशीन संज्ञानात्मक फंक्शन्सचे अनुकरण करते जे लोक इतर मानवांशी संबद्ध करतात. मन, जसे की शिकणे आणि समस्या सोडवणे, तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता ही संज्ञा लागू होते. या कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केवळ एका क्षेत्रात मर्यादित राहणार नसून, तो सर्वच क्षेत्रात करता येणार आहे. आरोग्य क्षेत्रात अधिक जलद, स्वस्त आणि अचूक निदान करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर केला जातो, त्यामुळे रुग्णाचे परिणाम सुधारतात आणि खर्च कमी होतो.उदाहरणार्थ, यापैकी काही उपकरणे आयबीएम वॉटसन आणि चॅटबॉट्स आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती येवू शकते. मात्र या तंत्रज्ञानामुळे रोगाचे निदान करणे सोपे होणार असून, उपचार करणे सोपे जाईल. मात्र यातून भविष्यात गुंतागुंत वाढू शकते. रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन अत्यंत पुनरावृत्ती कार्यांची काळजी घेण्यासाठी अंमलात आणले जाते जे मानवांपेक्षा जलद आणि अधिक सहजतेने केले जाऊ शकते. शिवाय, अधिक चांगली क्लायंट सेवा देण्यासाठी, मशीन लर्निंग अल्गोरिदम विश्‍लेषण आणि सीआरएम प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट केले आहेत. याचबरोबर ते शैक्षणिक क्षेत्रात या कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे नवे युग अवतरू शकते. कारण कृत्रिम बुद्धीमत्ता आणि शिक्षण क्षेत्र याचा मोठा संबंध असून, या बुद्धीमत्तेद्वारे शिकणार्‍यांचे मूल्यमापन करणे, त्याच्या गरजेनुसार जुळवून घेणे, आदी कार्य कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर करता येवू शकते. त्याचबरोबर दुर्गम भागात, ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे विस्तारण्यास मोठी मदत होवू शकते. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर अनेक क्रांत्या यशस्वी करता येवू शकतात. बुद्धीमत्ता, संरक्षण, व्यापार या सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता एक नवा आयाम निर्माण करू शकतो. मात्र यासंदर्भात बोलतांना स्टीफन हॉकिन्स म्हणाले होते की, संपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीमुळे मानवजातीचा अंत होऊ शकतो. कारण  जेव्हा मानव कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करतो, तेव्हा ते स्वत: ला विलग करून घेतील आणि सतत वाढत्या गतीने स्वतःची पुनर्रचना करतील. मंद जैविक विकासामुळे विवश असलेले लोक स्पर्धा करू शकत नाहीत आणि त्यांची जागा घेतली जाईल. एआय तंत्र जे दहशतवाद्यांच्या हातात पडले तर, ते आधुनिक दहशतवादी नेटवर्क सोडू शकतात ज्यात मशीन्सचा समावेश आहे जे मानवजातीच्या अस्तित्वासाठी हानिकारक असू शकतात.यामुळे मानवाशी असलेले मानवी नातेसंबंध कमी होऊ शकतात. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे मानव जो भावनिकदृष्टया जोडलेला आहे, तो तसाच जोडलेला राहणार नाही. त्यामुळे इमोशन्स दुर्मिळ होतील. त्यामुळे एकीकडे मानवाचे आयुष्य, जगणे सुलभ होत असतांना, ते यंत्र होवून जाईल. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कितपत करावा, याचे धोरण ठरवण्याची गरज आहे. भारत सरकारने कृत्रिम धोरण ठरवण्यासंदर्भात गेल्या वर्षी एक समिती नेमली होती. त्याच धर्तीव्र केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्‍विनी वैष्णव आम्ही लवकरच  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चॅटबॉटच्या भारतीय आवृत्तीबाबत लवकरच मोठी घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भारतात देखील लवकरच कृत्रिम बुद्धीमत्ता अवतरणार आहे. मात्र याचे धोरण ठरवून, याचा वापर मर्यादित ठेवला तर, भारताला विकासाची मोठी संधी आहे. कारण आजमितीस भारतासमोर अनेक आव्हाने निर्माण होतांना दिसून येत आहे. तरूण पिढी मोबाईलच्या आहारी जातांना दिसून येत आहे. त्यामुळे एक दिवस मोबाईलपासून सुटका म्हणून मोबाईल डिटॉक्सचा पर्याय निर्माण करतांना तरूणाई दिसून येत आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता देखील मानवी मुळावर उठू नये, म्हणजे झाले.

COMMENTS