राज्यात शाळा सुरू होण्याचा निर्णय लांबणीवर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात शाळा सुरू होण्याचा निर्णय लांबणीवर

ओमिक्रॉनची दहशत ; मुंबई पुण्यात 15 डिसेंबरनंतर शाळा होणार सुरूमुंबई :राज्यात 01 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या, त्यासंदर्भातील शासन आदेश आणि शाळ

देशमुख महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
वाळू माफियांकडून तहसीलदारांंस शिवीगाळ व धमकी
निवळी वृक्षलागवड प्रकरणी चौकशी समिती : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

ओमिक्रॉनची दहशत ; मुंबई पुण्यात 15 डिसेंबरनंतर शाळा होणार सुरू
मुंबई :राज्यात 01 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या, त्यासंदर्भातील शासन आदेश आणि शाळेची नियमावली देखील काढण्यात आली होती. मात्र अचानक दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला ओमिक्रॉन विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातच नव्हे तर देशभरात नवे निर्बंध लादले असून, यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर गेला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद महापालिकेने आपल्या जिल्ह्यातील शाळा कुठे 10 तर कुठे 15 डिसेंबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेने ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेने शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्या प्रस्तावावर चर्चा झाली आणि त्यानंतर मुंबई महापालिका अंतर्गत येणार्‍या शाळा या उद्यापासून सुरू न करता 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेप्रमाणेच इतर शहरात देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. नाशिक पालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. नाशिक पालिका या संदर्भात 10 डिसेंबरला निर्णय घेणार आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातील आदेश शासनाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षकांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण झालेले असावे, तसेच नाशिकमधील ज्या गावात शाळात शाळा सुरू होते, तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव किती आहे, याची माहिती घेतल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येईल, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. पुण्यातील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी असे सांगितले की, राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. पुण्यातील शाळांनी पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण केली असली तरी, दुसरीकडे शाळा सुरु करावी, अशी पालकांची भूमिका आहे. मात्र पुणे महापालिकेने शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यावर ठाम
विविध जिल्ह्यातील महानगरपालिकांकडून शाळा सुरू करण्याचा निर्णय लाबंणीवर टाकला असला तरी अद्याप, शिक्षण विभागाकडून शाळा लांबणीवर टाकण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिक्षण विभाग राज्यातील पहिली ते सातवी शाळासुरू करण्यावर ठाम आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे देखील जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शाळेचा संपूर्ण परिसर निर्जंतूक करणे सर्व कर्मचार्‍यांनी दोन्ही डोस तातडीने पूर्ण करणे, विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क देण्यात देणे, तसेच विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सामूहिक खेळ आणि एकत्र डबा खाण्यास मनाई करण्यात आली आहे.

COMMENTS