Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील पाणीकपातीचा निर्णय अखेर रद्द

मुंबई : जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी येत्या 22 तारखेला मुंबईतील गोरेगाव, जोगेश्‍वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथे 16 तासांसाठी पाणीप

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे वाजले सूप ; लोकसभा मुदतीआधीच अनिश्‍चित काळासाठी स्थगित
मी कधीही पक्षीय राजकारण केले नाही :-माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड
माणूसकी ओशाळली

मुंबई : जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी येत्या 22 तारखेला मुंबईतील गोरेगाव, जोगेश्‍वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथे 16 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, मुंबई महानगरपालिकेने तांत्रिक कारणास्तव पाणीकपातीचा हा निर्णय मागे घेतला. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
अंधेरीच्या के पूर्व वॉर्डमध्ये दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्यासाठी सावंत मार्ग आणि कार्डिनल ग्रेशियस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेशियस मार्ग आणि सहार मार्ग जंक्शनपर्यंत हे काम केले जाणार होते. या कामादरम्यान जुनी खराब न झालेली 1200 मिमी व्यासाची जलवाहिनी काढली जाणार होती. या कामाला येत्या 22 मे रोजी सकाळी 09.00 वाजता सुरुवात होणार असून 23 मे रोजी सकाळी 10 वाजता समाप्त होणार होते. या कामाला 16 तास लागणे अपेक्षित होते. या कालावधीत गोरेगाव, जोगेश्‍वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथील काही भागात पाणीपुरवठा किंवा पाणीकपातीची घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव काम रद्द करण्यात आले. यामुळे पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला, असे बीएमसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. हे देखभालीचे काम पूर्ण झाल्यावर वेरावली जलाशय 1,2 आणि 3 च्या पाणीपातळीत लक्षणीय सुधारणा होईल. अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्‍चिमसह जोगेश्‍वरी पूर्व आणि जोगेश्‍वरी पश्‍चिम आणि विलेपार्ले पूर्व आणि विलेपार्ले पश्‍चिम येथील पाणीपुरवठ्यात कायमस्वरूपी वाढ होईल, असे मुंबई महानगरपालिकेने आधीच स्पष्ट केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्पा रखडला. हे काम मे 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. आतापर्यंत दुसर्‍या टप्प्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, काही कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. उर्वरित काम जूनअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मिरा-भाईंदर शहराला प्रतिदिन 218 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले होते. यामुळे मुबलक पाण्यासाठी मिरा-भाईंदरकरांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

COMMENTS