Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलक दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 वर

जखमींची संख्या 88 वर पोहोचली

मुंबई / प्रतिनिधी : मुंबईत झालेल्या वादळी वार्‍यामुळे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लावलेला घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्र

धक्कादायक…कंटेनरच्या धडकेत एस टी चालक ठार (Video)
सेन्सॉर बोर्डाच्या नकारानंतर ’72 हुरेन’ चा ट्रेलर रिलीज
आ. लंके व देवरेंनी समन्वयाने काम करावे; अधिकारी महासंघाच्या कुलथेंचा सल्ला

मुंबई / प्रतिनिधी : मुंबईत झालेल्या वादळी वार्‍यामुळे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लावलेला घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 140 बाय 140 चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात कोसळल्याने जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. या दुर्घटनेत 74 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या 88 झाली आहे. दरम्यान, याच जाहिरात फलकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठा म्हणजे 17,040 स्न्वेअर फूट आकाराचा जाहिरात फलक म्हणूनही नोंद झालेली होती.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर परिसरात पेट्रोल पंपाजवळील फलक मुळाशी असलेले लोखंडी खांब मोडून जमिनीवर आदळला. या दुर्घटनेच्या ध्वनीचित्रफिती काही मिनिटांतच समाज माध्यमांवर फिरू लागल्या. पाऊस पडत असल्यामुळे पेट्रोल पंपाच्या परिसरात अनेक वाहन चालक, पादचारी आडोशाला उभे होते. त्यांच्यावरच हा महाकाय फलक कोसळल्यामुळे अनेकजण गाडले गेले. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, बीपीसीएल, महानगर गॅस आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या प्राधिकरणांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. फलक लोखंडी असल्याने क्रेनशिवाय बाजूला करणे अथवा उचलणे शक्य नव्हते. त्यामुळे बराच वेळ मदतकार्य सुरू होऊ शकले नाही. याच दरम्यान किरकोळ जखमी झालेल्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. यावेळी दबलेले अनेकजण मदतीची याचना करत होते. मदतीसाठी होर्डींगच्या खालून येणारे आवाज हेलावून टाकणारे होते.कोसळलेला जाहिरात फलक बीएमसीच्या परवानगीशिवाय बांधला असल्याचे स्पष्ट केले आहे. पंतनगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग हे अनधिकृत आहे. यासाठी महापालिकेने परवानगी दिली नव्हती. बीएमसी जास्तीत-जास्त 40 बाय 40 चौरस फूट होर्डिंग उभारण्याची परवानगी देते. मात्र, कोसळलेले होर्डिंग 120 बाय 120 चौरस फूट आकाराचे होते. सध्या बीएमसी एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी एजन्सीला बीएमसीची वैध परवानगी नसल्याबद्दल त्यांचे सर्व होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनास्थळी चार होर्डिंग्स होत्या. यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र, होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी बीएमसीची कोणतीही परवानगी, एनओसी एजन्सी, रेल्वेकडून घेण्यात आली नसल्याचीही माहिती समोर आली आहे. पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा फलक लावणारे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक भावेश भिंडे यांच्यासह अन्य काही जणांवर 304, 338, 337, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पंतनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे.

COMMENTS