Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडकरींच्या खच्चीकरणासाठीच कॅगचा अहवाल

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबई/प्रतिनिधी ः मोदी सरकारच्या सात योजनमध्ये अनियमितता झाल्याचे ताशेरे कॅगने ओढल्यानंतर खळबळ उडाली आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाच

कडकायच्या थंडीतही पोलिस भरती साठी उमेदवारांची गर्दी
जर्मनी येथील ४० साईभक्तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे घेतले दर्शन
बाळाच्या तोंडावर चिकटपट्टी लावणार्‍या नर्सेसवर कारवाई

मुंबई/प्रतिनिधी ः मोदी सरकारच्या सात योजनमध्ये अनियमितता झाल्याचे ताशेरे कॅगने ओढल्यानंतर खळबळ उडाली आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे, विशेष म्हणजे या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर अधिक ताशेरे ओढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राजकीय वजन कमी करण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
कॅगचा अहवाल हे निमित्त असून, नितीन गडकरींचा राजकारणातून काटा दूर करण्यासाठीच हा कॅगचा अहवाल समोर आणला असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. गडकरींचा काटा काढायचा आहे. हे अंतर्गत राजकारण आहे. कदाचित त्यामागची पार्श्‍वभूमी असू शकते. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार असतांना कॅगने फक्त गडकरींच्या खात्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यावरून सर्व काही स्पष्ट होते. गडकरींची प्रतिमा स्वच्छ आहे. विकासाची आहे. त्यातून त्यांना साईड ट्रॅक करायचे. त्यांचे राजकारण संपवायचे हा डाव असू शकतो, असे वडेट्टीवार म्हणाले. कॅगमध्ये गडकरींच्या खात्यांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. पण पंतप्रधान हे रस्ते समितीचे अध्यक्ष असतात. मग पंतप्रधानांची भूमिक काय हा प्रश्‍न उपस्थित होतो. केंद्रात मोठा भ्रष्टाचार आहे. आता जे आले त्यावर केंद्र सरकार काय कारवाई करेल हे पाहणार आहोत, असेही ते म्हणाले. मतदारांनी सरकार विरोधात राग व्यक्त केला पाहिजे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मतपेटीतून राग यायला मतपेटी सुरक्षित आहे का? काल बावनकुळे म्हणाले बटन दाबण्यासाठी जातील तेव्हा मत भाजपलाच मिळेल. एवढा आत्मविश्‍वास येतो कुठून? महागाई वाढली आहे. सीएनजी वाढला आहे. बेरोजगारी आहे. सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे कमळाचे बटन कोणी दाबेलच कसे? म्हणजे यात काही तरी गोलमाल आहे. पुन्हा कमळालाच मतदान जात असेल तर देशाला धोका होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका आमदाराची बायको आत्महत्या करणार होती म्हणून त्याला मंत्रिमंडळात घेतले. एक राजीनामा देत होता म्हणून त्याला मंत्री केले. दुसर्‍याला राणेंची भीती वाटत होती म्हणून त्याला मंत्रीपद दिले. आता हे तीन उदाहरणे आहेत. अशी चाळीस आमदारांचीही उदाहरणे असू शकतात. त्यामुळे घेणार कुणाला आणि काढणार कुणाला असा प्रकार आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

रामदेव बाबांसाठी सरकारकडून तिजोरी खुली – केंद्र सरकारने रामदेव बाबांचे 14 कोटी रुपये माफ केले. रामदेव बाबा आता साधू संत थोडीच राहिले आहेत. त्यांनी जागा घेतली. त्यांना कर माफ केला. उगाच सरकारने कर माफ केला नाही. तिजोरी अशाच लोकांवर खाली केली जात आहे. मंत्री त्यांचेच आहेत. त्यांच्यासाठी तिजोरी खुली करणार नाही तर काय? आता भाजपच्या वाट्याला काय मिळणार माहीत नाही. पण हे चाळीस दुणे ऐंशी हे टपूनच बसले आहेत. जेवढे मिळेल तेवढे  ओरबडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा हल्लाही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी चढवला.

COMMENTS