श्रीरामपूर ः आईचे महत्त्व साने गुरुजींनी’ श्यामची आई पुस्तकातून सांगितले,तसेच आजच्या मातृभक्ती आणि देशशक्ती यांचे संस्कार सामर्थ्य वाढावे, त्यासा

श्रीरामपूर ः आईचे महत्त्व साने गुरुजींनी’ श्यामची आई पुस्तकातून सांगितले,तसेच आजच्या मातृभक्ती आणि देशशक्ती यांचे संस्कार सामर्थ्य वाढावे, त्यासाठी भारतीयत्वाची श्रद्धा आईच्या ऋणभावनेतून जपावी अशी अपेक्षा भोकर येथील अभ्यासू ह.भ.प. संतोष महाराज पटारे यांनी केली.
इंदिरानगर येथील कै.ग.भा. रुक्मिणी पांडुरंग शिंगटेआजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणी प्रवचनात ह.भ.प. संतोष महाराज पटारे बोलत होते. यावेळी माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, ज्ञानेश्वरी माऊली मुरकुटे, सुजित कडू तसेच डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संतसाहित्य ग्रंथ, शाल देऊन पटारे महाराजांचा उत्कृष्ठ प्रवचनाबद्दल सन्मान केला. अनिल पांडुरंग शिंगटे, गणेश पांडुरंग शिंगटे, निर्मलाताई पांडुरंग शिंगटे, अलकाताई काशिनाथ शिंदे, श्रीमती सुनीताताई मधुकर काटे आणि शिंगटे परिवाराने पटारे महाराजांचा सन्मान करून उपक्रमाचे नियोजन केले. ह.भ.प संतोष महाराज पटारे यांनी श्रीसंत गोरा कुंभार, श्रीसंत ज्ञानेश्वर, श्रीसंत नामदेव,श्रीसंत तुकाराम आदिंच्या धर्मविचारांचे संदर्भ सांगत मातृभक्तीचे आणि देशशक्तीचे महत्त्व पटवून दिले. तसेच बोरावके कॉलेजमधील भूगोल विभाग प्रमुख प्रा. प्रकाश कुलकर्णी यांच्या आदर्श अध्यापनातील आणि संस्कार उपक्रमांच्या आठवणी सांगितल्या. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगतातून आई म्हणजे आत्म्याचा ईश्वर असून तिची सेवा हेच खरे जगण्यातील पुण्य असून आपली मातृभक्ती ही संस्कृतीनीती वाढली पाहिजे. शिंगटे परिवार यादृष्टीने आदर्श असल्याचे सांगितले. याप्रसंगी पंचक्रोशीतील बंधू भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.
COMMENTS