Homeताज्या बातम्यादेश

दरड कोसळली, कैलास यात्रेमधील प्रवासी अडकले

नवी दिल्ली ः उत्तराखंडमधील तवाघाट-लिपुलेख राष्ट्रीय महामार्गावरील गरबाधर येथे दरड कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. गरबाधर

नवोदय परीक्षेत श्रुतिका झगडेची निवड
एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या
महिलांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न : ना. अ‍ॅड. यशोमती ठाकूर

नवी दिल्ली ः उत्तराखंडमधील तवाघाट-लिपुलेख राष्ट्रीय महामार्गावरील गरबाधर येथे दरड कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. गरबाधर हे पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुलाला चीन सीमेला जोडणार्‍या रस्त्यावर आहे. हा रस्ता बंद झाल्यामुळे आदि कैलास यात्रेला जाणार्या यात्रेकरूंचा जत्था अडकल्याचे वृत्त आहे. भूस्खलनामुळे स्थानिक प्रशासन सतर्कतेवर आहे. गरबधर येथील रस्ता गेल्या चार दिवसांपासून दरड कोसळल्याने बंद होता, तो खुला करण्यासाठी सीमा रस्ते संघटनेचे प्रयत्न सुरू होते. सोमवारी रस्ता खुला करण्यात आला, मात्र काही वेळाने येथे भीषण दरड कोसळली.

COMMENTS