Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय श्रीरामच्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली !

नेवासा फाटा ः नेवासा तालुक्यातील मुकींदपूर शिवारात असलेल्या रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमामध्ये महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्श

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त टूर सर्कीटचे आयोजन : मंत्री शंभूराज देसाई
नंदुरबारला साकारणार आदिवासी क्रीडा प्रबोधिनी
18 व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाला उद्यापासून होणार सुरुवात

नेवासा फाटा ः नेवासा तालुक्यातील मुकींदपूर शिवारात असलेल्या रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमामध्ये महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करून प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी रामनामाच्या जयघोषाने रामनगरी व परिसर दुमदुमला होता.
यावेळी झालेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळयाच्या निमित्ताने वेल्हाळे येथील महंत परमहंस मुक्तानंद महाराज यांचे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मावर हरिकिर्तन झाले. कीर्तनात त्यांनी प्रभू रामचंद्र भगवंताचे जीवनकार्य विषद केले.या प्रसंगी महंत सुनीलगिरी महाराजांनी पुष्पांनी सजवून आणलेल्या तबकामध्ये रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली होती.या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.सदरची मूर्ती श्रीराम साधना आश्रमाच्या सभामंडपात आल्यानंतर सजविण्यात आलेल्या पाळण्यात मूर्ती ठेवण्यात आली होती. यावेळी श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज, संगमनेर वेल्हाळे येथील महंत परमहंस मुक्तानंद महाराज, पैठण येथील भागवताचार्य साध्वी सुवर्णानंदगिरी महाराज चैतन्य, श्रीरामपूर येथील हभप बजरंग महाराज, पुणे येथील अमितराजे शिर्के व पूनम अमितराजे शिर्के, सरपंच सतीश निपुंगे यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मुकींदपुर येथील सेवेकरी भाविक सुनीता निपुंगे यांनी श्रीराम जन्माचा पाळणा म्हटला. उपस्थित संत महंतांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढुन पुष्पवृष्टीद्वारे प्रभू श्री रामचंद्र भगवंताचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
जन्मोत्सव प्रसंगी किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झालाहे गीत स्व:त महंत सुनीलगिरी महाराजांनी सादर करतांना उपस्थित भाविकांनी हात वर करून ठेका धरत त्यास दाद दिली उपस्थित महिला भगिनींनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. यावेळी उपस्थित भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. भक्तांच्या सुखासाठी प्रभू रामचंद्र भगवंतांनी कार्य केले त्यांच्या जन्माने मनामनात रामभक्ती जागृत झाली आहे,जीवनात मोठयांशी संगत करा, जिद्दीने यश संपादन करा, प्रेमाची माणसे दूर करू नका, देवाचे चरण धरून जीवनाचे सार्थक करा असे आवाहन साध्वी सुवर्णानंदगिरी चैतन्य महाराज यांनी यावेळी बोलतांना केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळयात योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या मित्र मंडळाचा यावेळी गौरव करण्यात आला.सोहळयात अन्नदानासाठी योगदान देणार्‍या दात्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गायनाचार्य शंकर महाराज तनपुरे, मक्तापूर येथील दत्ताभाऊ कांगुणे, अशोकराव निपुंगे, संतसेवक वैभव निकम, सीताराम निपुंगे, पोपट महाराज निपुंगे, प्रकाशगुरू मुळे, अमोलगुरू मुळे, होमगार्ड समदेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे, आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. उपस्थित हजारो भाविकांना दिवसभर शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते. श्रीराम जन्मोत्सव सोहळयानिमित्ताने श्रीराम साधना आश्रमामध्ये गाथा पारायण, सांयकाळी संगीतमय भागवत कथा व कीर्तन महोत्सव आयोजित केला होता या सर्व धार्मिक कथा किर्तनांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी 7 एप्रिल रोजी श्रीमद भागवत कथाकार साध्वी तुलसीदिदी यांच्या काल्याच्या किर्तनाने श्रीराम जन्मोत्सव सोहळयाची सांगता करण्यात येणार आहे.

COMMENTS