Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रसचा बदलता चेहरा

काँगे्रसकडे 10 वर्षांपूर्वी बघितल्यास हा गलितगात्र झालेला पक्ष दिसून येत होता. कोणतीही नाविण्यपूर्ण योजना नाही, पक्षामध्ये कोणतेही फेरबदल नाही, स

कथनी आणि करणीतील फरक
लाडक्या भावा-बहिणीत दुजाभाव का ?
बोगस प्रमाणपत्रांचा गोरधधंदा

काँगे्रसकडे 10 वर्षांपूर्वी बघितल्यास हा गलितगात्र झालेला पक्ष दिसून येत होता. कोणतीही नाविण्यपूर्ण योजना नाही, पक्षामध्ये कोणतेही फेरबदल नाही, संघटनात्मक बांधणी नाही, तसेच सत्तेत नसल्यावर आपल्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यावा लागतो, त्यात काँगे्रस अपयशी पडल्याचे चित्र होते. मात्र दहा वर्षांनंतर काँगे्रसने पुन्हा एकदा झेप घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाटा राहुल गांधी यांचा दिसून येत आहे. काळासोबत राहुल गांधी यांनी आपल्यात काही बदल करून घेतल्याचा हा परिणाम आहे. काँगे्रसला नवसंजीवनी देण्याचे काम खर्‍या अर्थाने राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेने दिले. कारण काँगे्रसची पाळेमुळे गावा-गावात रुजलेली आहे. तरीदेखील काँगे्रसला मध्यंतरीच्या काळात याचा विसर पडला होता. 2004 मध्ये सत्ता मिळाल्यानंतर काँगे्रस काहीशी निवांत असल्याचे दिसून येत होती. कारण दहा वर्षांनंतर काँगे्रसची अशी पडझड होईल अशी कल्पना काँगे्रसने स्वप्नातही केली नव्हती. कारण काँग्रेस गाफील होती, जनतेला ग्रहित धरत होती. त्याचबरोबर नाविण्यपूर्ण बदल करण्यात काँगे्रसला त्यावेळेस अपयश आले. परिणामी जनतेचा रोष वाढत होता. अशावेळेस काँगे्रसने काही बदल केले असते, तर कदाचित काँगे्रसची पडझड झाली नसती.

मात्र या 10 वर्षांमध्ये काँगे्रसला अनेक बाबी शिकता आल्या, पाहत्या आल्या. काँगे्रसने 99 जागांवर जरी मजल मारली असली तरी, काँगे्रसने आणखी व्यापक बदल करण्याची गरज आहे. शिवाय शेतकरी, दलित, ओबीसी वर्ग आपल्यासोबत जोडण्यासाठी काँगे्रसला विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. मुळातच गेल्या 10 वर्षांपासून देशामध्ये विरोधी पक्षनेता नव्हता. कारण लोकसभेत विरोधीपक्ष नेतेपदासाठी किमान 1/10 जागा मिळवणे गरजेचे असते, आणि काँगे्रस 50 जागांचा टप्पा देखील ओलांडू शकली नव्हती. मात्र 10 वर्षानंतर काँगे्रसला प्रथमच विरोधी पक्षनेतेपद मिळतांना दिसून येत आहे. कारण काँगे्रसने 99 जागा जिंकत मोठी झेप घेतल्याचे दिसून येत आहे. या पदावर कुणाची वर्णी लागेल, याचा निर्णय घेणार आहे. काँगे्रसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते व्हावे अशी गळ घातली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते पद मिळाल्यास राहुल गांधी यांना बर्‍याच बाबी शिकता येईल. तर दुसरीकडे गेल्या 10 वर्षांपासून केंद्रात मोदी असले तरी, 5 वर्षांनंतर त्यांच्या कामाच्या विशेष असा करिश्मा दिसून आला नाही. राम मंदिर, कलम 370 या बाबी सोडल्यास विशेष असे सर्वसामान्यांसाठी मोदीजी यांनी काहीही केले नाही. परिणामी या वर्गात रोष होता. तसेच भाजपचे खासदार आपण मोदींच्या नावावर निवडून येतो, म्हणून निर्धास्त होते, मात्र यावेळेस त्यांना मोदी देखील वाचवू शकले नाही, कारण जनतेला विकास हवा आहे. देशामध्ये जीएसटी कर लागू झाल्यानंतर केंद्राच्या तिजोरीत कोट्यावधींचा पैसा जमा होतांना दिसून येत आहे. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधांना गती येतांना दिसून येत आहे. मात्र या व्यतिरिक्त शेतकरी वर्ग, गरीबांच्या समस्या सोडवण्यात केंद्राला अपयश आले असेच म्हणावे लागेल. केंद्राकडून शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रूपये टाकण्यात येतात, मात्र शेतकर्‍यांना 6 हजार रूपयांचे अनुदान नको तर, त्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव चांगला हवा आहे. मोदीजी यांनी शेतमालाचा भाव दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र शेतकर्‍यांच्या शेतमालाचे भाव दुप्पट झाले नाही, परिणामी शेतकर्‍यांत रोष आहे. तोच रोष निवडणुकीतून दिसून आला. आणि त्याचा फायदा काँगे्रसला झाला. मात्र काँगे्रसने सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेण्याची गरज आहे. कारण राजकारण हा काही फावल्या वेळेत करण्याच उद्योग नसून, पूर्णवेळ राजकारण करण्याची गरज आहे, जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी 24 तास बांधील असण्याची गरज आहे. तरच जनता स्वीकारते.

COMMENTS