नगरपरिषदेच्या असहकारामुळे बारगळले सभापतींचे स्वच्छता अभियान शेवगाव : शेवगाव नगरपरिषद परिषदेच्या स्वच्छता आरोग्य सभापती दीप्ती कमलेश गांधी यांच

नगरपरिषदेच्या असहकारामुळे बारगळले सभापतींचे स्वच्छता अभियान
शेवगाव : शेवगाव नगरपरिषद परिषदेच्या स्वच्छता आरोग्य सभापती दीप्ती कमलेश गांधी यांचे स्वच्छता अभियान नगरपरिषदेच्या असहकारामुळे बुधवारी (दि. ४ मार्च) बारगळले, सभापती दीप्ती कमलेश गांधी यांनी २३ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांना या संदर्भात पत्र दिले होते.
मोठा गाजावाजा करून आज सकाळी सोनुमिया मशीन भूमीमध्ये यासंदर्भात स्वच्छता अभियान राबवले जाणार होते. परंतु नगर परिषदेच्या प्रशासनाकडून दीप्ती गांधी व भाजपाचे कमलेश गांधी व इतर नगरसेवकांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद व साधनसामग्री उपलब्ध न झाल्यामुळे हे स्वच्छता अभियान बारगळले गेले असा आरोप कमलेश गांधी यांनी केला आहे.
यावर बोलताना कमलेश गांधी म्हणाले की, हा एक चांगला सामाजिक उपक्रम होता परंतु याच्यामध्ये सुद्धा राजकारण आल्याकारणाने ह्या चांगल्या कामाला नगरपरिषदेकडून खोडा घालण्याची काम झाले. पुढील काळात यासंदर्भात आंदोलनातून उत्तर दिले जाईल असे कमलेश गांधी यांनी म्हटले. यावेळी संजय फडके, सागर फडके, डॉ, नीरज लांडे, नगरसेवक नितीन दहिवाळकर, राहुल मगरे, अमर शेख, खंडू बुलबुले, आधी नगर परिषदेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS