Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरासमोर झोपलेल्या तरूणाचा निर्घृण खून

लोणंद / वार्ताहर : पाडेगाव (ता. फलटण) येथील शिवंचा मळा येथे घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली

कुडाळ ग्रामपंचायतींचा निधी जिल्हा परिषद दिव्यांग निधीमध्ये घेऊ नये : विरेंद्र शिंदे
समाजकल्याण विभागातर्फे तृतीयपंथीयांसाठी आज सातार्‍यात मेळावा
राष्ट्रवादी विरोधक एकसंघ ठेवणे भाजपासाठी कसरत : निशिकांत पाटील यांना स्वकीयांचाच अडथळा

लोणंद / वार्ताहर : पाडेगाव (ता. फलटण) येथील शिवंचा मळा येथे घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. लोणंद पोलीस घटनास्थळी पोहचले असून चौकशी सुरू केलीय. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाडेगाव गावठाणपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवंचा मळा येथील राहुल नारायण मोहिते (वय 31) हा तरूण आपल्या घरासमोर झोपला होता. झेपेमध्ये त्याच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केला. या प्राणघातक हल्ल्यात राहुल याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घरातील लोक सकाळी बाहेर आले असता त्यांना झोपलेल्या ठिकाणी राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर लोकांनी या घटनेची तत्काळ माहिती लोणंद पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राहुल याचा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला असावा, याचा तपास लोणंद पोलीस करत आहेत. घटनास्थळास पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी भेट दिली असून पुढील तपासाबाबत अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

COMMENTS