नाशिक प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावर एका तरुणाचा बेशुद्ध अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह गणेश पंजाब पठाडे

नाशिक प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावर एका तरुणाचा बेशुद्ध अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह गणेश पंजाब पठाडे या तरुणाचा असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मूळचा हिंगोलीतील असलेला गणेश हा आपल्या बहिणीला सासरी सोडायला नाशिकला आला होता. पण बहिणीला सोडून पुन्हा माघारी परतत असताना अचानक त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, याचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.
COMMENTS