Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’मविआ’ ची दलाली आणि कमिशन खोरी मोडीत काढली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची टीका

चंद्रपूर ः राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलाली आणि कमिशन खोरी मोठया प्रमाणावर वाढली होती.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणा

यंदाही बारावीच्या निकालात मुलींचा डंका | DAINIK LOKMNTHAN
ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर.
राज्याच्या मंत्र्यांना ‘बत्ती गुल’चा फटका

चंद्रपूर ः राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलाली आणि कमिशन खोरी मोठया प्रमाणावर वाढली होती.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला, पहिले उद्धव ठाकरेंना द्यावे लागत होते, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जावे लागत होते. उद्धव ठाकरेंना देखील काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते, त्यामुळेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने एकत्र येत कमिशन खोरी मोडीत काढण्यासाठी सत्तांतर केले, अशी घणाघाती टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चंद्रपूरात केली.

नड्डा सोमवारी महाराष्ट्र दौर्‍यावर असून राज्यातील 18 लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने मिशन सुरू केले आहे. या मंदीच्या दिवसातही भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. आज अमेरिका आणि रशिया संकटातून जात आहेत, पण, भारत अर्थव्यवस्था स्थीर करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण स्टीलमध्ये जगात दोन नंबरला आहे. आपल्या देशात 57 टक्के मोबाईल बनवले जातात, असे नड्डा यांनी सांगितले. या सर्व गोष्टी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करत आहोत. आज आपण देशात आरामात आहोत, मास्क कुणीही वापरत नाही. चीन, अमेरिकेत अजुनही कोरोना मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेत अजुनही लसीकरण पूर्ण झालेले नाही, युरोपमध्येही तिच परिस्थीती आहे. चीनची अवस्था आपण पाहतो आहे, तेच भारतात 220 कोटी लसीकरण तसेच बुस्टर डोस झाले आहेत असे नड्डा म्हणाले. महाविकास आघडीमध्ये डिलरशीप, ब्रोकरेंज आणि ट्रान्सफर असा फंडा होता. खूप दुख: झाले होते की मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी 2019 मध्ये बाळासाहेबांचे विरोधक असणार्‍या लोकांसोबत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली. अशा लोकांना माफ करायचे का असा सवाल यांनी उपस्थित केला आहे.

मंदीच्या काळतही भारत पाचव्या स्थानावर – जगातील बहुतांश देश आर्थिक संकटात आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्नात आहेत. मंदीच्या दिवसातही भारत ब्रिटनला पाठिमागे टाकून पाचव्या नंबरवर गेल्याचे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. चंद्रपूर येथे आयोजित भाजपच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

COMMENTS