Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीत काळे गटाने उघडले खाते

बहादरपूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाऊसाहेब रहाणे बिनविरोध

कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रक्रिया सुरू असून अर्ज छाननीच्या दिवशी बहादरपुर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी

लाभांश देण्याची परंपरा याहीवर्षी अबाधित : आ.काळे
वारीतील टेके पाटील ट्रस्टचे सामाजिक कार्य दिशादर्शक
पुणतांब्यात आज रेल्वे रोको आंदोलन

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रक्रिया सुरू असून अर्ज छाननीच्या दिवशी बहादरपुर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्ज दाखल केलेल्या कोल्हे गटाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला असून काळे गटाचे भाऊसाहेब कचरू रहाणे यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले असून धारणगावप्रमाने बहादरपुरच्या देखील कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील 18 डिसेंबर रोजी होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाची असणारी बहादरपूर ग्रामपंचायतीची देखील निवडणूक होणार आहे. सरपंच पदासह 11 सदस्य असलेल्या बहादरपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कोल्हे गटाच्या एका सदस्याचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला आहे. त्यामुळे त्या जागेसाठी काळे गटाचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे काळे गटाने या 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाने आपले खाते उघडले आहे. याच बहादरपूर गावाने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आ. आशुतोष काळे यांना जवळपास 288 मताचे मताधिक्य दिल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. तेव्हापासून बहादरपूर गावात काळे गटाला पोषक वातावरण आहे. मागील अनेक वर्षापासूनच्या चुकीच्या लोकांच्या हातात असलेल्या ग्रामपंचायतीच्या कारभाराला ग्रांमस्थ वैतागलेले असून त्याचा उद्रेक येत्या निवडणुकीत होणार असल्यामुळे निर्भेळ यश मिळण्याचा कार्यकर्त्यांना विश्‍वास असून मागील अनेक वर्षानंतर बहादरपूर ग्रामपंचायतीवर काळे गटाची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळत आहे. मागील काही दिवसांपासून कोल्हे गटाचे असंख्य कार्यकर्ते आ.आशुतोष काळे यांच्या कार्यावर प्रभावित होवून काळे गटात प्रवेश  करीत असून बहादरपूरमध्ये देखील याची पुनरावृत्ती पहायला मिळाली. यावेळी कोल्हे गटाचे अरुण प्रभाकर रहाणे,रवींद्र कांताराम रहाणे,प्रवीण बाळासाहेब रहाणे यांनी काळे गटात प्रवेश केला त्यांचे आ. आशुतोष काळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपसरपंच गोपीनाथ  रहाणे,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब रहाणे,सोमनाथ अशोक रहाणे, सोमनाथ निवृत्ती रहाणे,आप्पासाहेब पाडेकर,साहेबराव वामन रहाणे,रामनाथ पाडेकर,शिवाजी चंद्रभान रहाणे, बाळासाहेब रहाणे, सतीश रहाणे, दशरथ रहाणे, प्रशांत खकाळे, जगन बोरसे,कैलास रावसाहेब रहाणे,सोसायटीचे व्हा चेअरमन दत्तू भीमा खकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS